Tharal Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, अर्जुनने तन्वीबाबत सगळं खरं सांगितल्याने सायली खूप दुःखी होते. त्यावेळी अर्जुन सायलीची समजूत काढायचा प्रयत्न करत असतो तितक्यात रविराज तिथे येतात. रविराज आल्याने सायली खाली जात असताना तन्वी मध्ये येते आणि अर्जुनच्या खोलीत जात असल्याचे सायलीला सांगते. सायली खेचत तिला पायरीवरुन खाली उतरवते. रविराज अर्जुनला सांगतात आता मला कामाकडे लक्ष देता येणार नाही कारण मला प्रतिमाकडे, घराकडे लक्ष द्यायचे आहे त्यामुळे माझ्या सर्व केस तुला बघाव्या लागतील, असं अर्जुनला सांगतो.
शिवाय ते डेड बॉडीचं डीएनए तन्वीशी कस जुळलं हे शोधण्यासाठी रविराज हॉस्पिटलला जाण्याचे ठरवतो. तर इकडे सायलीला तन्वी मुद्दाम चिथवते. तन्वी सायलीला अर्जुनला लवकरच मी आपलंसं करेन आणि त्यासाठी नंतर तूच माझ्या मागेपुढे फिरशील असं चॅलेंज करते. तेव्हा सायली तन्वीवर प्रचंड संतापते. पूर्णा आई, प्रतिमाची स्मृती कधी येईल, ती आपल्याला कधी ओळखू शकेल, अशी खंत कल्पनाकडे बोलून दाखवते. कल्पना पूर्णा आईला प्रतिमाने काही वर्षांपूर्वी कानातले दिले होते ते दाखवते. ते दाखवून प्रतिमाला काहीतरी आठवेल असा विश्वासही कल्पना पूर्णा आईला देते.
दुसरीकडे अर्जुन सायलीला समजावतो. पण सायली काही मानायला तयार होत नाही. सायलीला मनवण्यासाठी अर्जुन उठाबशा काढतो. तन्वी तिथे येताच अर्जुन खाली लपतो. सायली तन्वीला अर्जुन इथेच असल्याचे सांगते तेव्हा अर्जुन फोन खाली पडला असल्याचे खोट सांगतो. तर ते ऐकून सायली आणखी चिडते. आता मात्र अर्जुन तन्वीसमोर एकदमच संभ्रमात पडतो. तेवढ्यात कल्पना तिथे येते.आणि दोघांना एकांतात वेळ घालवू दे तू अस्मिताच्या खोलीत जा असं तन्वीला सांगते.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : छोटा पुढारीला कोसळलं रडू, शेवटी धनंजय पोवारनेच दिली साथ, म्हणाला, “माझ्या घरच्यांना…”
कल्पना व तन्वी तिथून निघून गेल्यावर अर्जुन सायलीची माफी मागतो तरीदेखील ती मानत नाही. शेवटी अर्जुन सायलीसमोर उठा-बशा काढतो. त्यावेळी सायली अर्जुनवर खुश होते आणि त्याला माफ करते. मालिकेच्या पुढील भागात असे पाहणार आहोत की, सायली मुद्दाम अर्जुनला भरपूर कॉफी आणून देते.