Bigg Boss Marathi 5 Update : ‘बिग बॉस मराठी ५’ ला सुरुवात झाली असून या शोला दहा दिवस पूर्ण झाले आहेत. मंगळवारी ‘बिग बॉस मराठी’चा १०वा एपिसोड प्रसारित झाला. या खेळातील अंकिता प्रभू वालावलकर हिने बिग बॉसचा टास्क सर्वांना वाचून दाखवला. या कार्यासाठी वर्षा उसगांवकर यांना संचालक म्हणून नेमण्यात आले, शिवाय त्यादेखील या कार्यात सहभागी होतात. या घरात पहिला कॅप्टन्सी टास्क पार पडला आणि यात अंकिता वालावालकर ही घराची पाहिली कॅप्टन झाली. कॅप्टन्सी टास्कचं नाव ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ असं होतं. मात्र या टास्कमुळे घरातील स्पर्धकांमध्ये चांगलीच जुंपली. एकीकडे नव्या सीझनला पहिला कॅप्टन मिळाला. दुसरीकडे आपल्याला कॅप्टन होता आलं नाही म्हणून अरबाज, निक्की, वैभव आणि जान्हवी यांचा राग अनावर होतो. (Bigg Boss Marathi 5 Ankita Valawalkar captain)
या कार्यासाठी वर्षा उसगांवकर यांना संचालक म्हणून नेमण्यात आले, शिवाय त्यादेखील या कार्यात सहभागी होतात. योगिता चव्हाण, सूरज चव्हाण, धनंजय पोवार, वर्षा उसगांवकर आणि निखिल या आठवड्यात कॅप्टन होणार नाही, हे ‘भाऊच्या धक्क्या’वर ठरले होते. या टास्क दरम्यान मोटरमनच्या केबिनमधील सीटवर जो बसेल तो कॅप्टन पदाचा उमेदवार ठरवणार असतो. मोटरमनसाठी दोन जागा असतात. त्याशिवाय, ट्रेनमध्ये हिरवी व लाल मार्गिका असे दोन भाग केले असतात. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या आदेशानंतर ट्रेन कोणत्या मार्गिकेवर धावणार हे ठरते. त्या मार्गिकेवर जे स्पर्धक बसले आहेत, त्यांच्यातील एक सदस्य कॅप्टनपदासाठी पात्र ठरणार असतो.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : छोटा पुढारीला कोसळलं रडू, शेवटी धनंजय पोवारनेच दिली साथ, म्हणाला, “माझ्या घरच्यांना…”
कॅप्टनपदाचा उमेदवार ठरवण्याची महत्त्वाची जबाबदारी मोटरमनवर असल्याने ती खुर्ची पटकावण्यासाठी दोन्ही ग्रुपमध्ये जोरदार राडा होता. वैभव-सूरज, आर्या-जान्हवी यांच्यात वादावादी होते. संचालक असलेल्या वर्षा उसगांवकर यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करत अरबाज संताप व्यक्त करतो. तिसऱ्या फेरीत बिग बॉस या टास्कमध्ये ट्विस्ट आणतात आणि हिरवी मार्गिका बंद करतात. त्यामुळे केवळ निळ्या मार्गिकेसाठी लढत होते. हॉर्न वाजल्यानंतर वैभव व योगितामध्ये सीटवर बसण्यावरुन चढाओढ होते. दोघेही मोटरमनच्या सीटवर आपला दावा सांगतात. योगिता अक्षरश: रडते पण आपली जागा सोडत नाही. त्यामुळे अखेर संचालिका वर्षा उसगांवकर या योगिताही मोटरमनच्या सीटवर बसली असल्याचे सांगतात.
या टास्कमध्ये योगिता ज्या एका प्रवाशाला बुलेट ट्रेनमध्ये ठेवणार, त्याचे नाव कॅप्टन म्हणून जाहीर होणार असते. मात्र, योगिता ही पॅडी, निक्की, अभिजीत, वैभव यांना बाद करते आणि अंकिताची कॅप्टन म्हणून निवड करते. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वाची पहिली कॅप्टन होण्याचा बहुमान अंकिताला मिळतो. अंकिता कॅप्टन झाल्यावर डिपी दादा अंकिताला उचलून कॅप्टनच्या खोलीत नेतो. त्या ठिकाणी यंदाच्या सीझनमधील कॅप्टनसाठी अभिजित व इतर सदस्य गाणं गातात. मात्र, यात निक्की, अरबाज, जान्हवी, वैभव हा ग्रुप सहभागी झालेला नसतो.