‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, अर्जुन अलिबागला जायला निघताच सायली त्याला काळजी घ्यायला सांगते आणि दर तासाने तिथे काय घडतं तर कळवायचं आहे याची आठवण करुन देते. अखेर अर्जुन तन्वीला घेऊन अलिबागला निघतो. अर्जुनसाठी गाडीत तन्वी गजरा घेते. गजऱ्याच्या सुगंधाने अर्जुनला शिंका सुरु होतात. त्यावरून तो तन्वीला लहानपणीची आठवण करुन देतो पण तिला काही कळत नाही. (Tharal Tar Mag Serial Update)
त्यामुळे अर्जुनला ती आठवत नसल्याचे सांगते. इथे घरी अस्मिता सायलीला तुझा अर्जुनला कंटाळा आला वगैरे असं खोटं सांगते. हॉटेलला पोहोचल्यावर अर्जुन ठरल्याप्रमाणे सायलीला कुठे पोहोचलोय, काय करतोय याचे सर्व अपडेट्स मॅसेज करुन देतो. सायलीही तन्वीपासून सांभाळून रहा असा मेसेज अर्जुनला करते. तन्वीसमोर असताना सतत सायलीचे मॅसेजवर मॅसेज अर्जुनला येत असल्याने तन्वी त्याला काम आत्ता करायचे नाही असं सांगते. अखेर तन्वी अर्जुनचा फोन काढून घेते. पण तरीही मॅसेज येतच राहिल्याने अर्जुन घाबरतो.
आणखी वाचा – पारूचा लग्नाला नकार, खरंच कायमची घर सोडून जाणार का?, की हरीशसमोर सत्य येणार?
इथे सायलीही मॅसेजला अजून अर्जुनचा रिप्लाय नसल्याने अस्वस्थ होते. सायलीचे घरी स्वयंपाकात लक्ष लागत नाही. विमल चहा देत सायलीला आराम करायला सांगते. पण सायलीचे लक्ष अजूनही अर्जुनच्या न आलेल्या रिप्लायकडेच लागलेले असते. इथे हॉटेलमध्ये अर्जुन तन्वीला खोटी रडकथा सांगायला सुरुवात करतो. तन्वी अर्जुनला खूप प्रेमाने बॉण्डिंगबद्दल समजावते. तन्वी मनातल्या मनात अर्जुनला अजिबात आता सोडणार नसल्याचे पक्के ठरवते आणि अर्जुनही मनात तन्वीला आता जेलमध्ये पोहोचवणारच असं ठरवतो.
मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, अर्जुन तन्वीबरोबर डान्स करत असतो. त्यावेळी तन्वी अर्जुनला ड्रिंक पाजते. आणि ड्रिंक प्यायल्यानंतर अर्जुन नाचताना खाली पडतो आणि हे सायली बघते. सायलीची रस्त्यातून समजूत काढत असताना सायली प्रतिमाचा अपघात होण्यापासून वाचवते. आता वाचवलेली ती बाई प्रतिमा आहे हे सत्य सायलीसमोर येईल का?, हे पुढील भागात कळेल.