‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, पारूच्या हळदी समारंभासाठी सगळीच मंडळी किर्लोस्करांकडे जमलेली असतात. तर इकडे आदित्य, प्रीतम, पारू, हरीश, दिशा, प्रिया सगळेजण कुलदेवतेच्या दर्शनाला गेलेले असतात. तेव्हा दिशा प्रियाला समज देते की, किर्लोस्कर मेन्शन मधील पुरुषांपासून लांब राहायचं आणि स्पेशली प्रीतमपासून तो माझा होणारा नवरा आहे. आमचा साखरपुडा झाला आहे. प्रियाला ही गोष्ट नव्यानेच कळते त्यामुळे ती प्रीतमशी बोलायचं नाही असे ठरवते. तर इकडे आदित्य पारू व हरीश पाया पडत असतात. (Paaru Serial Update)
तितक्यात हरीशला फोन येतो म्हणून तो फोन घ्यायला जातो तेव्हा गुरुजी येऊन पारू व आदित्यला आशीर्वाद देतात आणि सांगतात की, अनंत काळ तुमचा हा जोडा सुखात आनंदात राहील. हे ऐकल्यावर दोघेही चकित होऊन एकमेकांकडे पाहू लागतात आणि त्या वेळेला ते काहीच बोलत नाहीत. त्यानंतर घरी आल्यावर त्यांच्या हळदीची तयारी सुरु असते तर पारुची लगबग लागलेली असते की, हे सगळं कसं आपण हरीशला सांगायचं म्हणून तिची धाकधूक होत असते.
ती हळदीसाठी तयार नसते तर इकडे हळदीसाठी सगळेजण जमलेले असतात. तेव्हा अहिल्यादेवीही व आदित्य हरीशच्या बालपणीच्या मित्रांना भेटतात. हळद लावण्यासाठी हरीशला बोलवण्यात येत त्यावेळी सगळेजण धुमाकूळ घालत नाचताना दिसतात. तर इकडे पारू सावित्रीला सांगते की, मी हरीश सरांना भेटू शकत नाही पण तुम्ही तरी त्यांना भेटू शकता ना त्यामुळे ही चिठ्ठी नेऊन हरीश सरांना द्या. सावित्री नेऊन हरीशला चिठ्ठी देते ते दिशा पाहते आणि दामिनीला सांगते की, हरीश हातातून चिठ्ठी काही करून घेऊ नये म्हणजे पारूचा पुढचा प्लॅन काय आहे ते आपल्याला कळेल. सगळेजण हरीशला हळद लावत असतात.
आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, पारू तिचं गाठोड बांधत सांगते की, आता मी या घरात राहू शकत नाही. मला काही करून हे घर सोडून जावं लागेल. हरीश सरांची आणि माझी भेट झालीच नाही जी होणं खूप गरजेचं होतं. हे ऐकल्यावर सावित्रीला खूपच मोठा धक्का बसतो. आता पारू खरंच घर सोडून जाणार का?, हे पाहणं मालिकेच्या घेणाऱ्या भागांमध्ये रंजक ठरेल.