‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम आज घराघरांत लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलंय. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. यापैकी एक म्हणजेच निखिल बने. ‘आज भी दिन बने’ अशा आपली एक वेगळी ओळख निर्माण करत त्याने अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केलं आहे. निखिल बने आणि त्याचं कोकण प्रेम हे जगजाहीर आहे. निखिल हा मूळचा कोकणातला आहे. त्यामुळे तो त्याचं गावावरील प्रेम सोशल मीडियावर अनेक व्हिडीओद्वारे व्यक्त करत असतो. याआधी त्याने अनेक व्हिडीओ शेअर करत त्याच्या कोकण प्रवासाची सफर घडवून आणली असल्याचे पाहायला मिळाले आहे.
निखिल बनेचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाद्वारे निखिल नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. विशेषतः गावाकडच्या आठवणीही तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. आणि त्याच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच त्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याद्वारे त्याने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा कोकणची खास सफर घडवून आणली आहे. ज्यामधून त्याने गावच्या खास जागेबद्दल सांगितलं आहे.
आणखी वाचा – “आज बाबा असते तर…”, अभिनय बेर्डेने व्यक्त केली खंत, आठवणीत भावुक होत म्हणाला, “माझ्यात तो गुण…”
निखिलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो मुंबईहून गावी जतानाची झलक पाहायला मिळत आहे. यामध्ये त्याने रात्री ट्रेनने प्रवास केल्याचे सांगितले आहे. तसेच गावी गेल्यानंतर त्याने गावच्या मित्रपरिवाराबरोबर केलेली भटकंतीदेखील या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. कोकणात सध्या भात लावणी सुरु आहे. त्याची खास झलकसुद्धा निखिलने या व्हिडीओमधून दाखवली आहे. मग घरी जाऊन त्यांनी भेळ केली आणि त्यावर तावही मारला. त्यानंतर त्याने रात्री खेकडे पकडले. मग सकाळी उठून पुन्हा त्याने मुंबईसाठीचा परतीचा प्रवासही या व्हिडीओमध्ये दाखवला आहे.
दरम्यान, निखिलने शेअर केलेल्या या व्हिडीओला त्याच्या चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “खूपच छान”, “मला तुझे व्हिडीओ”, आवडतात”, “कोकण म्हणजे एक स्वर्गचं आहे”, “कोकणात गावाला जायची मजा काही वेगळीच” अशा अनेक कमेंट्सद्वारे या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.