‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, प्रिया शिवानी जाधवला भेटण्यासाठी खूप प्रयत्न करते पण अर्जुन आणि सायली तिला बोलण्यात गुंतवून ठेवतात. सायली कल्पनालासुद्धा सांगते की, श्वेता म्हणजेच शिवानी जाधव ही आजच्या केसची विशेष साक्षीदार आहे. त्यावर कल्पना प्रियाला कॉफी देऊन तिच्यापर्यंत न पोहोचण्याची काळजी घेते. अर्जुन प्रियाला तू कोर्टात हजर व्हायच्या आधी विरोधी पार्टीच्या वकिलाकडे लाच द्यायला आली आहेस हा मुद्दा मी कोर्टात मांडेन असं सांगत तिला भीती दाखवतो. (Tharal Tar Mag Serial Update)
शिवाय इथे तू आल्याचे किल्लेदारांना पण कळवेन असंही सांगतो. त्यामुळे प्रिया गोंधळते. आणि गडबडीत घराबाहेर पडते आणि साक्षीला फोन करते पण साक्षी काही तिचा फोन उचलत नाही. प्रिया नेमका का फोन करत आहे हे पाहण्यासाठी म्हणून साक्षी फोन उचलणार इतक्यात चैतन्य तिथे येऊन तिला अजिबात केसला जाईपर्यंत कुठलाही मध्ये डिस्टर्बन्स नको असं बजावतो. कोर्टात चैतन्य अर्जुनला सांगतो, साक्षीवर कितीही खोटे आरोप केलेस तरी मी तिचा वकील असल्याने तू सांभाळून रहा. कोर्टात सिनियर वकील किल्लेदार अर्जुनला शुभेच्छा देतात आणि चैतन्यला चुकीचा अशील निवडल्याबद्दल वाईट वाटतं असल्याचं सांगतात.
केस सुरु होताच जजना चैतन्य यापुढे साक्षीचा वकील आपण स्वतः असल्याचं सांगतो. अर्जुन साक्षीला प्रश्न विचारायला सुरु करतो, तेव्हा मागीलवेळी सीसीटीव्हीमध्ये जे दिसलं त्याबद्दलसुद्धा विचारणा करतो. तेव्हा हो ते खरंच होतं असं साक्षी सांगते. पण त्यावर अर्जुन ते सगळं खोटं होतं आणि आता सबळ पुराव्यांच्या आधारे ते सिद्ध करणार असल्याचं साक्षीला सांगतो.
मालिकेच्या पुढील भागात पाहणार आहोत की, अर्जुन साक्षी-महीपतच्या व्हिडीओ क्लिपचा खरा पुरावा कोर्टात सादर करून साक्षी खोटी असल्याचं सिद्ध करताना दिसत आहे. साक्षीवरील आरोप सिद्ध करत अर्जुन मधुभाऊंची या केसमधून सुटका करणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.