Tharal Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, तन्वी अर्जुनच्या खोलीत अर्जुनबरोबर प्रेमाचा खोटा आव आणत खोटी सहानुभूती मिळवायचा प्रयत्न करते. सायलीला जाग येताच सायली बाहेर येते तेव्हा तिला अर्जुनच्या खोलीतील लाईट सुरु असल्याचं दिसतं. त्याचवेळी अर्जुन दार उघडून पाहताच सायली वर येताना त्याला दिसते म्हणून तन्वीला तो लगेच तिथून जायला सांगतो. तन्वी लपताच सायली अर्जुनच्या खोलीत येते आणि अर्जुन दारातच सायलीला नुसता बघत राहतो.
सायलीला संशय येताच ती अर्जुनला इथे कुणी आल्याबद्दल विचारते तेव्हा अर्जुन इथे कुणीच आले नसल्याचे तिला खोटं सांगतो. सायली तिथून जाताच लपलेली तन्वी बाहेर येते अर्जुन तिला सायली पुन्हा येऊन गोंधळ घालण्यापेक्षा तू इथून जा असं सांगत तन्वीला अर्जुन जायला सांगतो. पूर्णा आई सायलीकडे प्रतिमाची तिच्या झोपेची चौकशी करते. ती शांत झोपल्याचे सायली पूर्णा आईला सांगते.
आणखी वाचा – Paaru Serial : आदित्यच्या जीवाला दिशापासून धोका, पारू-अहिल्यादेवींचं व्रत यातून त्याला बाहेर काढणार का?
रविराजसुद्धा प्रतिमाची नीट काळजी घेण्याचे वचन सायलीला देतो. अर्जुनला मात्र तन्वी खोलीत असल्याचे सायलीपासून लपवून ठेवल्याबद्दल पश्चाताप होतो. रविराज प्रतिमाच्या खोलीत येतो आणि तिला जुने फोटो दाखवतो ते बघून प्रतिमा घाबरते आणि अस्वस्थ होत खोलीबाहेर पडत पुन्हा सायलीला बिलगते. अर्जुन रविराजला याबद्दल विचारताच रविराज ती स्वतःला आणि आम्हाला विसरल्याचे अर्जुनला सांगतो. सायली प्रतिमाला घेऊन तिच्या खोलीत निघून जाते.
आणखी वाचा – Video : सुंदर सजावट, वेगवेगळी झाडं अन्…; इतकं मोठं आणि स्वच्छ आहे शशांक केतकरचं घर, Inside Video समोर
मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, नागराज सुमनला दागिने पॉलिश करण्याबद्दल विचारतो. हे ऐकताच सुमन एकदम घाबरुन जाते. नागराजचा खरा चेहरा सुमन रविराजसमोर केव्हा आणणार हे सारं पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.