‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, सावित्री पारूला घेऊन आदित्यला पाहायला जात असते. पारू सुरुवातीला तयारच नसते मात्र सावित्री तिला तयार करायला सांगते की, तुला आदित्य बाबांना काही करुन पहावच लागेल, त्यांच आणि तुझं नातं आहे, तू गेलीस तर त्यांना बरं वाटेल, असं म्हणून ती घेऊन जात असतानाच दिशा दिला अडवते आणि सांगते की, तुझ्या आशीर्वादांची आदित्यला काहीच गरज नाही आणि तू इथे का आली आहेच हेच मला समजत नाही आहे. नोकरानं नोकरासारखा वागायचं असं बरंच काही ती पारूला बोलत असते तितक्यात तिथे अहिल्यादेवी येतात आणि अहिल्यादेवी सांगतात की, अशी कशी तिच्या आशीर्वादाची गरज नाही. आदित्यला सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे असं म्हणून पारूला हाताला धरुन त्या आदित्यला बघायला नेतात आणि सांगतात की, बघ तुझे आदित्य सर उठत नाही आहेत. तू त्याची मैत्रीण आहेस ना. तुला त्याची काळजी असते ना मग आज तू त्याला हाक मार आणि उठायला सांग. (Paaru Serial Update)
मात्र पारू त्यावेळेला निशब्द आणि डोळ्यात पाणी आणून पाहत असते त्याच वेळेला आदित्य असलेल्या आयसीयु रूम मधून नर्स बाहेर येतात आणि सांगतात की, मी डॉक्टरांना बोलवायला चालले आहे. पेशंटची तब्येत सिरीयस आहे. त्यावेळेला अहिल्या देवी आत जातात. आदित्य जोरजोरात श्वास घेत तडफडत असतो. डॉक्टर आल्यानंतर अहिल्यादेवींना ते बाहेर थांबायला सांगतात तर श्रीकांत अहिल्यादेवींना घेऊन बाहेर येतो आणि अहिल्यादेवी येऊन तिथे जोर जोरात रडू लागतात आणि सांगतात की, मी आज अहिल्यादेवी म्हणून रडत नाही आहे तर एका मुलाची आई म्हणून रडत आहे.
त्यानंतर डॉक्टर बाहेर येऊन सांगतात की पेशंटची तब्येत खूपच खालावली आहे त्यामुळे तुम्ही देवाकडे प्रार्थना करा. हा एकच मार्ग आहे की काहीतरी दैवी चमत्कार होऊ शकतो. यानंतर अहिल्यादेवी श्रीकांतला म्हणतात की, श्रीकांत आपण या डॉक्टरांना देव मानतो ना आणि डॉक्टरच आपल्याला देवाकडे प्रार्थना करायला सांगतात. जर माझ्या लेकाचे प्राण हे देवाच्याच हातात असतील तर मी देवाबरोबरही लढायला तयार आहे. तर एकीकडे दिशाने मारेकऱ्याला पैसे देत आदित्यचा जीव घ्यायला सांगितलेलं असतं.
आणखी वाचा – Video : सुंदर सजावट, वेगवेगळी झाडं अन्…; इतकं मोठं आणि स्वच्छ आहे शशांक केतकरचं घर, Inside Video समोर
ही गोष्ट दामिनीला कळते मात्र दिशा दामिनीला सांगते की सर्वांवर वर्चस्व गाजवायला आणि किर्लोस्कर कंपनीची मालकीन व्हायला मी तुलाही मारू शकते हे ऐकून दामिनी घाबरते आणि सांगते की, मी सुद्धा तुझ्या टीममध्ये आहे. आता मालिकेच्या पुढील भागात दिशाचा तो मारेकरी आदित्यला मारू शकेल का?, की पारू आणि अहिल्यादेवीचं व्रत आदित्यला या संकटातून वाचवेल हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.