‘ठरलं तर मग’ मालिकेत एका मागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सध्या चैतन्य व साक्षीच्या साखरपुड्याची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. चैतन्यने सुभेदारांच्या घरी येऊन साक्षीबरोबर साखरपुडा करणार असल्याचे सांगताच सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तर इकडे सायली व अर्जुन चैतन्यला साक्षीचा खरा चेहरा दाखवून देण्यासाठी धडपड करत असतात. मात्र चैतन्य सायली व अर्जुन यांचं काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो तर एकीकडे साक्षीला चैतन्य सायली व अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दलही सांगतो, त्यामुळे साक्षी याचा फायदा घेण्याच्या ठरवते. (Tharal Tar Mag Promo)
तर महिपतने साक्षीला साखरपुड्याची कल्पना दिलेली असते त्यानुसार त्यांचा साखरपुडा होणार असतो. अशातच मालिकेच्या एका नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधुन घेतल आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, साक्षी व चैतन्य यांच्या साखरपुड्यासाठी सगळेजण जमलेले असतात तेव्हा गुरुजी येऊन म्हणतात की, साखरपुड्याच्या विधींना सुरुवात करायची का?, तेव्हा चैतन्य हो असं म्हणतो. तेवढ्यात सुभेदार कुटुंबही तिथे पोहोचतात, पूर्णा आजी चैतन्यला विचारतात, आमच्या शिवाय तू साखरपुडा करणार आहेस का?, सुभेदार कुटुंबाला एकत्र आलेलं पाहून चैतन्य खूपच खुश होतो.
चैतन्य साक्षीला म्हणतो, ही बघ माझी फॅमिली आज माझ्यासाठी इथे आली आहे. असं म्हणत तो त्यांच्याबरोबर फोटो काढायला जातो तेव्हा तो साक्षीलाही बोलवतो. साक्षी सुभेदार कुटुंबाला एकत्र पाहून खूपच घाबरते. तितक्यात पाठीमागून अर्जुन व सायलीदेखील आलेले असतात. अर्जुन सायलीला पाहून चैतन्यलाही धक्का बसतो. चैतन्यला वाटत असत की, अर्जुन न सायली त्याच्या साखरपुड्यासाठी येणार नाहीत. त्यानंतर चैतन्यला अर्जुन व सायली एका रूममध्ये घेऊन जातात. आणि त्याला साक्षी व कुणालच्या अफेअरचे सर्व पुरावे देतात हे पाहून चैतन्यला खूप मोठा धक्का बसतो.
चैतन्यसमोर आता साक्षीचा खरा चेहरा आलेला असतो. रागाच्या भारत तो हा साखरपुडा मोडायला जातो यावर अर्जुन चैतन्यला थांबवतो आणि म्हणतो की, ज्या नाटकाची सुरुवात साक्षीने केली त्याचा आता शेवट मात्र आपण करायचा. अर्जुन, सायली व चैतन्य मिळून आता साक्षीचा कसा काटा काढणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.