‘ठरलं तर मग’ मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेच्या रंजक कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. इतकंच नव्हे तर मालिका सुरु झाली तेव्हापासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत नवनवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. अर्जुन व सायली यांच्यातील कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपलं असून मालिकेत नवा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. (Jui Gadkari Shared Ofscreen Video of Sakshi)
मालिकेच्या कथानकाबरोबरच मालिकेतील कलाकारांनाही प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरलं आहे. अर्जुन- सायली याचबरोबर पूर्णा आजी, प्रताप, कल्पना, अस्मिता, चैतन्य, साक्षी, प्रिया ही पात्रही लोकप्रिय झाली. सायली-अर्जुन विरोधात महीपत-साक्षी यांचा संघर्ष पाहायला मिळत आहे. मधुभाऊंची सुटका व्हावी म्हणून अर्जुन मेहनत करत आहे तर एकीकडे मधुभाऊंना अडकवण्यासाठी साक्षी-महीपत प्रयत्न करत आहेत. दरम्यान आता मालिकेत अर्जुनला साक्षी विरोधात पुरावे मिळाले आहेत.

मालिकेत साक्षी व सायली यांच्यातील वैर नेहमीच पाहायला मिळत. साक्षी सायली-अर्जुनला अडकवण्यासाठी नेहमीच कट आखताना दिसते. मालिकेत साक्षीची भूमिका अभिनेत्री केतकी पालव साकारताना दिसत आहे. वैयक्तिक आयुष्यात सायली व साक्षी दोघींमध्ये छान मैत्री आहे. नेहमीच मालिकेत सर्वांना त्रास देणारी कधीही कोणालाही न घाबरता चलाखीने उत्तर देणारी आणि कधीही न रडणारी अशी साक्षी खऱ्या आयुष्यात नेमकी कशी आहे याचा नुकताच जुईने खुलासा केला आहे.
“ऑनस्क्रीन सायलीला रडवणारी साक्षी ऑफस्क्रीन इमोशनल चित्रपट पाहून अशी रडते”, असं कॅप्शन देत जुईने केतकीचा म्हणजे ऑनस्क्रीन साक्षीचा चित्रपट पाहतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या स्टोरीमध्ये जुईने तिला टॅग देखील केलेलं आहे. चित्रपट पाहताना तिला सीन पाहून रडू येत तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. यावरुन ऑफस्क्रिन दोघींचं छान बॉण्डिंग असल्याचं पाहायला मिळतं.