शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गरोदरपणानंतर सासरी परतली सई लोकूर, सूनेच्या गृहप्रवेशाची सासूबाईंनी केली अशी तयारी, व्हिडीओमध्ये दिसली घराची झलक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 23, 2024 | 10:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sai Lokur New Home

गरोदरपणानंतर सासरी परतली सई लोकूर, सूनेच्या गृहप्रवेशाची सासूबाईंनी केली अशी तयारी, व्हिडीओमध्ये दिसली घराची झलक

‘बिग बॉस’ मराठी या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून अभिनेत्री सई लोकूरने विशेष लोकप्रियता मिळवली. ‘बिग बॉस’मुळे सईने चाहत्यांच्या मनात घर केलं. सोशल मीडियावर ही सई बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर सई मात्र कुठेही झळकली नाही. कालांतराने तिने तीर्थदीप रॉय बरोबर लग्न सोहळा उरकला. सई तिच्या लग्नामुळेही पुन्हा एकदा चर्चेत आलेली पाहायला मिळाली. त्यानंतर सईने आणखी एक गुडन्यूज देत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. (Sai Lokur New Home)

लग्नाच्या ३ वर्षांनंतर सईने डिसेंबर महिन्यात गोड मुलीला जन्म दिला. सईने गोंडस अशा बाळाला जन्म दिला. चिमुकल्या पाहुणीच्या आगमनाची आनंदाची बातमी तिने चाहत्यांसह शेअर केली. आई झाल्यानंतर आणि आई होण्याआधीही सई बरीच चर्चेत आली होती. कारण सईच्या मॅटर्निटी फोटोशूटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे सई आई केव्हा होणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या होत्या. सईने गेल्या वर्षी १७ डिसेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिला. अभिनेत्रीने तिच्या बाळाचं स्वागत बेळगाव येथे केलं. सोशल मीडियावरही सई बाळाबरोबर खेळतानाचे अनेक रील व्हिडीओ शेअर करताना दिसते.

आणखी वाचा – सुंदर सजावट, प्रशस्त जागा अन्…; अमेरिकेत असं आहे मृणाल दुसाणीसचं घर, पाहा Inside Photos

View this post on Instagram

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

इतकंच नव्हे तर ट्रेडिंग गाण्यांवरील व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. यानंतर आता सईच्या आणखी एका आनंदाच्या बातमीने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. लग्नाला तीन वर्षे झाल्यावर सई सासरी राहायला गेली आहे. सई आणि तीर्थदीप यांनी गेल्यावर्षी १० जुलैला बंगळुरूमध्ये नवीन घर विकत घेतलं होतं. “लग्नानंतर ३ वर्षांनी मी आता अखेर सासरी चालले. मी खूप उत्साही आहे. नवं शहर, नवीन घर, नवीन आयुष्य”, असं कॅप्शन देत तिने स्टोरी पोस्ट केली.

आणखी वाचा – पारू-हरीशच्या साखरपुड्यात मोठं विघ्न?, अहिल्यादेवींचा रागही अनावर, मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

सईने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेत्रीच्या सासूबाईंनी तिचं कसं स्वागत केलं याची झलक पाहायला मिळत आहे. सासरी आलेल्या सूनेचं सासूबाईंनी मोठ्या प्रेमाने स्वागत केलं. यावेळी त्यांच्यातील बॉण्डिंग खास असल्याचं दिसलं. सई घरात येताना तिचं औक्षण करत त्यांनी स्वागत केलं. फुलाची सजावट करत संपूर्ण घर सजवलं होतं.

Tags: marathi actresssai lokursai lokur familySai Lokur New Home
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 taarak mehta ka ooltah chashmah bagha
Entertainment

सीनदरम्यानच ढसाढसा रडू लागला बाघा, आईच्या आठवणीत पाणावले डोळे, निर्मात्यांनी सांभाळलं

जून 19, 2026 | 9:48 am
suhasini mulay Wedding
Entertainment

वयाच्या ६०व्या वर्षी लग्न, फेसबुकवर झालं प्रेम आणि…; ‘लगान’ फेम अभिनेत्रीची प्रेमकहाणी, पती आहेत…

जून 18, 2026 | 3:54 pm
Tula Pahata Movie
Entertainment

‘तुला पाहता’ चित्रपटाच्या निमित्ताने नचिकेत लेलेची नवी इनिंग, पार्श्वगायक म्हणूनही जबाबदारी सांभाळणार

जून 18, 2026 | 2:00 pm
Actresses Opens Up On Casting Couch
Entertainment

केबिनमध्ये बंद केलं, नायकाबरोबर रात्र…; बॉलिवूड अभिनेत्रींकडून कामाच्या बदल्यात केलेल्या घाणेरड्या मागण्या, मोठा खुलासा

जून 18, 2026 | 12:30 pm
Next Post
Shahrukh Khan Health Update

शाहरुख खान रुग्णालयात भरती, नवऱ्याला पाहायला धावत पळत पोहोचली गौरी खान, तब्येतीबाबत मोठी माहिती समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.