शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शाहरुख खान रुग्णालयात भरती, नवऱ्याला पाहायला धावत पळत पोहोचली गौरी खान, तब्येतीबाबत मोठी माहिती समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 23, 2024 | 10:54 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shahrukh Khan Health Update

शाहरुख खान रुग्णालयात भरती, नवऱ्याला पाहायला धावत पळत पोहोचली गौरी खान, तब्येतीबाबत मोठी माहिती समोर

बॉलिवूड किंग शाहरुख खानबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शाहरुख खानबाबत मोठी बातमी ऐकायला मिळाली या बातमीने चाहत्यांमध्ये काळजीच वातावरण पाहायला मिळालं. काल बुधवारी शाहरुखची तब्येत अचानक बिघडली असल्याचं समोर आलं. त्यानंतर त्याला अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अभिनेत्याच्या तब्येतीचे अपडेट जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. समोर आलेल्या अपडेटनुसार शाहरुख अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहे. (Shahrukh Khan Health Update)

रुग्णालयात उपचार घेताना शाहरुखबरोबर त्याची पत्नी गौरी खान आहे. पतीची तब्येत बिघडल्याची बातमी समजल्यानंतर गौरी धावतच केडी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखला डिहायड्रेशनचा त्रास झाला होता. इकडे जुही चावलाही शाहरुखला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि तिनेदेखील माध्यमांसमोर तब्येतीचे अपडेट शेअर केले.

आणखी वाचा – लग्नाच्या तीन वर्षांनी सई लोकूर गेली सासरी, सूनेच्या गृहप्रवेशाची सासूबाईंनी केली अशी तयारी, व्हिडीओमध्ये दिसली घराची झलक

Gauri Khan has reached KD hospital to see #ShahRukhKhan pic.twitter.com/fDUodO4y6i

— Shah Rukh Khan Fc – Pune ( SRK Fc Pune ) (@SRKFC_PUNE) May 22, 2024

शाहरुख खान मंगळवारपासून अहमदाबादमध्ये आहे. आयपीएल २०२४च्या प्लेऑफ सामन्यात शाहरुखची टीम कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला होता आणि त्यामुळे शाहरुख अहमदाबादमध्ये होता. सामना संपल्यानंतर शाहरुख तिथल्या आयटीसी नर्मदा हॉटेलमध्ये थांबला, तिथे अचानक त्याची तब्येत बिघडली. शाहरुखच्या तब्येतीचे अपडेट देताना जुही चावलाने सांगितले की, “त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्याला निरीक्षणाखाली ठेवले आहे. गुरुवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे”.

आणखी वाचा – सायलीच्या घर सोडून जाण्याने अर्जुन बेचैन, दोघांमधील वादाचं कारण येणार का सुभेदार कुटुंबासमोर?, पुढे काय घडणार?

शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, २०२३मध्ये त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. २०२३मध्ये त्याचे ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ हे एकूण ३ चित्रपट प्रदर्शित झाले. तिन्ही चित्रपटांनी भरघोस कमाई केली. शाहरुखचा आगामी ‘द किंग’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, ज्यामध्ये तो पहिल्यांदाच मुलगी सुहाना खानसह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. बाप-मुलीचा हा चित्रपट २०२५मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags: bollywood actorshahrukh khanshahrukh khan gauri khanShahrukh Khan Health Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi Marathi Serial update

विरोचकाच्या वशीकरणामधून राजाध्यक्ष कुटुंब बाहेर, रुपालीची शक्ती संपली, त्रिनयना देवी नेत्रा-इंद्राणीच्या साथीला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.