मराठीतील तरुण लोकप्रिय गायकांच्या यादीतील मुख्य दोन नावे म्हणजे गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंपायन. छोट्या पडदयावरील ‘सारेगमप लिटिल चॅम्पस’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेल्या या जोडीने त्यांच्या गायन शैलीने रसिक श्रोत्यांच्या मनात आपलं एक घर केले आहे. मुग्धा व प्रथमेश ही जोडी गेल्यावर्षी २१ डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकली. ‘आमचं ठरलं’ म्हणत एकत्र फोटो शेअर करत या जोडीने त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. प्रथमेश व मुग्धा यांनी त्यांच्या नात्याविषयी सांगितले तेव्हापासूनच त्यांच्या लग्नसोहळ्याकडे चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. (Mugdha Vaishampayan On Instagram)
दोघांच्या लग्नाला मनोरंजन विश्वातील बरेच कलाकार उपस्थित होती. नुकतेच यांच्या लग्नाला ५ महिने पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने मुग्धा-प्रथमेशने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला असून हाअ नवीन व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. मुग्धा-प्रथमेश यांच्या या व्हिडीओमध्ये लग्नातील काही खास क्षणांची झलक पाहायला मिळत आहे. यावेळी मुग्धाने नायउवारी साडी, त्यावर मराठमोळे दागिने असा लूक केल्याचे पाहायला मिळत आहे. तर प्रथमेशने पुणेरी लूक केला आसल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे.
आणखी वाचा – शाहरुख खान रुग्णालयात भरती, नवऱ्याला पाहायला धावत पळत पोहोचली गौरी खान, तब्येतीबाबत मोठी माहिती समोर
तसेच या व्हिडीओमध्ये मुग्धाचे वडील लेकीच्या लग्नात भावुक झाल्याचंदेखील या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर सप्तपदी, मंगलाष्टके व एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालतानाचे काही खास क्षणदेखील या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. लग्नातील वऱ्हाड मंडळींची लगबग व मुग्धा-प्रथमेश एकमेकांना हार घालत असल्याचेदेखील पहायला मिळत आहे. तसेच व्हिडीओमध्ये मुग्धा व प्रथमेश यांचा लग्नातील खास लूकही पहायला मिळत आहे.
या व्हिडीओला “तुझ्या रूपाने सखा जीवाचा जीवनात या आला गं…” हे गाणं लावण्यात आलं आहे. दरम्यान, या व्हिडीओला प्रथमेश-मुग्धाच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. “दोघांनाही कोणाची नजर लागू नये”, “खूप गोड आणि बाबांच्या डोळ्यात पाणी आलं”, “किती छान”, “असेच कायम एकत्र राहा, “सगळ्यात गोड सोंज्वळ आणि सात्विक जोडी”, “खूपच सुंदर, खूपच छान” अशा अनेक कमेंट्सद्वारे चाहत्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.