करण जोहरचा ‘कॉफी विथ करण ८’ हा लोकप्रिय कार्यक्रम पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांमुळे तसेच या कलाकारांच्या विविध वक्तव्यांमुळे हा कार्यक्रम नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. नुकत्याच या कार्यक्रमात बॉलिवूडच्या दोन प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर व आलिया भट्ट यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांच्यात चांगल्याच चर्चा रंगल्या. यावेळी आलियाने पती रणबीरबाबत एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगताना दिसत आहे. (Aliaa Bhatt In Koffee With Karan Season 8)
करणने कार्यक्रमातील प्रश्न-उत्तरांच्या एका खास सत्रात आलिया-करीना यांना काही प्रश्न विचारले. यात त्याने अलियाला “रणबीर जेव्हा इतर अभिनेत्रींबरोबर काम करतो? किंवा त्या अभिनेत्री घरी येतात. तेव्हा तुला त्याचा संशय आला आहे का?” असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देत तिने असं म्हटलं आहे की, “अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला विनाकारण वाटतात. या सर्व गोष्टी अस्तित्वात नाहीत. तो सगळ्यात आधी एक अभिनेता आहे. त्यानंतर माझा पती आहे. मी अशा सर्व चर्चांकडे दुर्लक्ष करते. कारण लोकं नेहमीच काही ना काही बोलत राहतात. जगातले एवढे सगळे मुद्दे सोडून लोक कायम आमच्याबद्दलच बोलत असतात.” असंही ती म्हणाली. त्याचबरोबर रणबीरबाबत लोकांना झालेल्या चुकीच्या गैरसमजाबद्दल तिने “रणबीरला लोकं जसे समजतात तसा तो अजिबात नाही. लोकांच्या विचारांपेक्षा तो पूर्णपणे वेगळा आहे.” असंही म्हटलं आहे.
यापुढे करणने तिला दूसरा प्रश्न असा विचारला की, “प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोण व कतरिना कैफ यांच्यातून तुला कोणती गोष्ट घ्यायला आवडेल?” यावर आलिया उत्तर देत असं म्हणाली की, “प्रियंकाचा आवाज मला आवाज खूपचं आवडतो. त्यामुळे मी तिच्याकडून आवाज घेईन. दीपिकाचा पडद्यावरील वावर खूप आवडतो. तर कतरिनाची मेहनत मला खूप आवडते. त्यामुळे तिच्याकडून मी मेहनत घेईन.”
आणखी वाचा – “आताच्या टॉप मालिका…”, हिंदी मालिकांबाबत गश्मीर महाजनीचं मोठं भाष्य, म्हणाला, “मला भूमिकांसाठी ऑफर होती पण…”
दरम्यान, आलिया-रणबीरबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच आलिया ‘जिगरा’ चित्रपटात झळकणार असून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. तर रणबीरचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तो दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाबरोबर पाहायला मिळणार आहे.