‘बिग बॉस’च्या १८ व्या पर्वाचा विजेता करणवीर मेहरा हा सध्या खूप चर्चेत आहे. करणच्या विजेता झाल्यानंतर अनेकांनी नाराजी दर्शविलेली पाहायला मिळाली. सोशल मीडियावर तर अनेकांनी विवियन विजेता व्हायला हवा होता असं म्हटलं आहे. थेट सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी करणला नापसंती दर्शविली आहे. मात्र या सगळ्याला करणने चोख प्रत्युत्तर देत विरोधकांची बोलती बंद केली होती. याआधीदेखील करणवीर ‘खतरो के खिलाडी’ या शोचादेखील विजेता ठरला होता. मात्र आता तो कोणत्याही कार्यक्रमामुळे नाही यर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. करणवीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पण या व्हिडीओमध्ये नक्की काय आहे? हे जाणून घेऊया. (karanveer mehra old video)
करणवीरचा सुमारे २० वर्ष जुना व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये करणवीर बोलताना दिसत आहे. तो जसा आता बोलतो तशीच त्याची बोलण्याची पद्धत आतादेखील अशीच असलेली बघायला मिळते. या व्हिडीओमध्ये तो म्हणत आहे की, “मलापण वाटतं की माझेही खूप चाहते असावेत. त्यामुळे जे माझी मालिका बघत असतील त्यांना मी रस्त्यावर फिरताना दिसलो तरीही ओळखावे. मी खूप चांगला माणूस आहे आणि मी ऑटोग्राफदेखील देईन”. हे बोलताना तो स्वतःही हसू लागतो. करणचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
करणवीरच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंतीदेखील मिळत आहे. यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “हा अगदीच शाहरुखसारखा दिसत आहे”, तसेच दूसरा नेटकरी म्हणाला की, “मला याच्यामध्ये शाहरुख दिसत आहे”, तसेच तिसरा एक नेटकरी म्हणाला की, “तरुणपणातील शाहरुखसारखा दिसून येत आहे”. तसेच अजून एकाने लिहिले की, “मला विवियन आवडायचा पण मी करणसाठी खूप खुश आहे”.
दरम्यान करणच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, २००५ साली ‘रिमिक्स’ या कार्यक्रमातून करियरची सुरुवात केली होती. त्यानंतर तो ‘अमृत मंथन’, ‘पवित्र रिश्ता’, ‘रिश्तो का मेला’, ‘फियर फॅक्टर : खतरो के खिलाडी’मध्ये दिसून आला होता. तसेच ‘द्रोणा’, ‘आगे से राइट’, ‘ब्लडी इश्क’, ‘मेरे डॅड की मारुती’ या चित्रपटांमध्येदेखील दिसून आला आहे.