१९९२ मध्ये आलेल्या तिरंगा या सुपरहिट चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे ममता कुलकर्णी. त्यानंतर ममता कुलकर्णीने ममता कुलकर्णीने जवळपास ४० बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘आशिक आवारा’, ‘करण अर्जुन’, ‘वक्त हमारा’ है आणि ‘क्रांतिवीर’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून तिने आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य केले. 2001 मध्ये रिलीज झालेला छुपा रुस्तम हा त्याचा शेवटचा हिट चित्रपट होता. यानंतर तिने २००२ मध्ये आलेल्या ‘कभी हम कभी तुम’ या चित्रपटातून मनोरंजन उद्योगाला अलविदा केला आणि केनियाला गेली. त्यानंतर तब्बल २४ वर्षांनी अभिनेत्री पुन्हा भारतात परतली. आता तिने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. (mamta kulkarni became sanyasi)
नुकतीच भारतात परतलेली ममता प्रयागराज येथील महाकुंभात सहभागी झाली होत्या. तिने केवळ कुंभमध्ये भाग घेतला नाही तर याच महाकुंभमध्ये आपल्या संन्यासाचादेखील निर्णय घेतला आहे. ममताने संन्यास घेतला असून तिने प्रयागराज महाकुंभात संन्यासाची दीक्षा घेतली. निवृत्तीनंतर या अभिनेत्रीला नवीन नावही मिळाले आहे. ममता कुलकर्णीचा पट्टाभिषेक सायंकाळी प्रयागात होणार आहे. यानंतर ममता कुलकर्णी यमाई ममता नंद गिरी या नावाने ओळखली जाणार आहे. ममता कुलकर्णीने प्रयागराज महाकुंभात संन्यासाची दीक्षा घेतली असून आता तिला किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर ही पदवी देण्यात येणार आहे.
आणखी वाचा – ‘छावा’साठी विकी कौशलने घेतलं तब्बल इतकं मानधन, तर रश्मिका मंदाना व अक्षय खन्नाची फी नक्की किती?
चादर पोशी समारंभ पार पडल्यानंतर तिला ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे. संगमच्या काठावर ममताने स्वतःच्या हातांनी पिंड दान केले आहे. जुना आखाड्याचे आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी तिला दीक्षा दिली आहे. ममता सध्या किन्नर आखाड्यात राहते. या महाकुंभमधील ममताचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये तिने भगवे वस्त्र परिधान केलेली पाहायला मिळत आहेत.
आणखी वाचा –
नुकतीच ममता कुलकर्णी २४ वर्षांनी भारतात परतली. अभिनेत्री इतकी वर्षे कुठे राहिली या प्रश्नावर ती म्हणाली होती की, “माझ्या भारत सोडण्याचे कारण अध्यात्म होते. १९९६ मध्ये माझा अध्यात्माकडे कल वाढला आणि त्यादरम्यान माझी भेट गुरू गगन गिरी महाराज यांच्याशी झाली. त्यांच्यामुळे माझी अध्यात्माची आवड वाढली. यानंतर माझी तपश्चर्या सुरु झाली. २००० ते २०१२ पर्यंत मी तपश्चर्या करत राहिले. मी अनेक वर्षे दुबईत होती आणि १२ वर्षे ब्रह्मचारी राहिले”.