प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादव हा ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता झाल्यापसून चांगलाच प्रसिद्धी झोतात आला आहे. गेले काही दिवस त्याच्या नावाच्या चांगल्याच चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. आज या कारणामुळे तर उद्या त्या कारणामुळे त्याच्याबद्दलच्या चर्चा या सतत सुरुच असतात. काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर सापाच्या विषाची तस्करी केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर एका रेस्टॉरंटमध्ये अज्ञात व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतर आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गाझियाबाद कोर्टाने त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. (Elvish Yadav FIR)
मनेका गांधींच्या पीपल फॉर ॲनिमल्स (पीएफए) या एनजीओचे सदस्य सौरभ गुप्ता यांच्या घरात जबरदस्तीने घुसून त्यांचा पाठलाग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एल्विश यादव आणि त्यांच्या लोकांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचे सौरभने सांगितले. ‘आज तक’च्या वृत्तानुसार, गाझियाबादमधील नंदग्राम पोलिस स्टेशनमध्ये एल्विशच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती, परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे न्यायालयाने आता कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
१० मे २०२४ रोजी, एल्विश यादव आणि त्याच्या साथीदारांनी सौरभ गुप्ताचा पाठलाग केला आणि नंतर १.३० वाजता राज नगर एक्स्टेंशनमधील गौर कॅस्केड्स येथे असलेल्या सोसायटीमध्ये प्रवेश केला. सुमारे १० मिनिटे ते त्यांच्या एसयूव्हीमध्ये सोसायटीच्या पार्किंग परिसरात फिरले आणि नंतर तेथून निघून गेले. सौरभला संशय आहे की, त्याच्या सोसायटीतील कोणीतरी एल्विश यादव आणि त्याच्या साथीदारांना सोसायटीत येण्यास मदत केली.
गुन्हा दाखल झाल्यापासून एल्विश आणि त्याचे साथीदार सोशल मीडियावर त्याला आणि त्याच्या भावाला धमकावत असल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. एल्विश तुरुंगात गेल्यापासून सौरभ गुप्ता आणि त्याच्या भावाला त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सतत धमक्या येत आहेत. यामुळे काही महिन्यांपूर्वी त्याला त्याचे फेसबुक अकाउंट डिलीट करावे लागले होते.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने घेतला संन्यास, महाकुंभात पार पडला दीक्षा समारंभ, स्वतःचं नावही बदललं अन्…
दरम्यान, एल्विशच्या नावाने खाते चालवणाऱ्या त्याच्या साथीदारांनी सौरभ गुप्ता आणि त्याच्या भावाला धमकावणे, त्यांच्या छायाचित्रांसह बनावट व्हिडीओ आणि बातम्या पोस्ट करणे सुरु ठेवले. एल्विशने एक व्हिडीओही केला होता आणि सौरभ गुप्ताचे घरातून अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. यांतर सौरभने गाझियाबादमधील नंदग्राम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता न्यायालयाने एल्विशच्या अटकेचे आदेश दिले आहेत.