Chhava Starcast Fees : विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘छावा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या बिग बजेट चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर या दमदार ट्रेलरने अनेकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं असून चित्रपटातील कलाकारांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर रश्मिका मंदाना या चित्रपटात राणी येसूबाईची भूमिका साकारताना दिसत आहे, तर अक्षय खन्ना या चित्रपटात क्रूर मुघल शासक औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. येत्या १४ फेब्रुवारीला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज होत आहे.
या चित्रपटातील कलाकारांच्या मानधनाबत आज आपण जाणून घेणार आहोत. विकी कौशलची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका त्याने उत्तमरीत्या पेलवली आहे. ‘टाईम्स नाऊ हिंदी’च्या वृत्तानुसार, विकी कौशलने हे पात्र साकारण्यासाठी १० कोटी रुपये इतकी मोठी फी आकारली आहे. विकीचे हे मानधन ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आणखी वाचा – श्वानाला कार चालकाने धडक दिल्यानंतर आस्ताद काळेने पोलिसांनाही घ्यायला लावली दखल, अभिनेत्याचं कौतुकास्पद काम
तर अभिनेत्री रश्मिका मंदाना विकी कौशलबरोबर या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रश्मिका येसूबाई भोसले ही भूमिका साकारत आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्रीला ४ कोटी रुपये मिळाले आहेत. ‘दृश्यम 2’ नंतर अक्षय खन्ना ‘छावा’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता औरंगजेबाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटासाठी त्याला २ कोटी रुपये फी देण्यात आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेता आशुतोष राणा या चित्रपटात सरसेनापती हंबीराव मोहिते यांची भूमिका साकारत आहे. यासाठी त्यांना ८० लाख रुपये मानधन मिळाले आहे.
विक्की कौशल यांच्या या चित्रपटात दिव्या दत्ता देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या चित्रपटासाठी अभिनेत्रीला ४५ लाख रुपये मिळाले आहेत. विकी कौशल आणि रश्मिका प्रथमच या चित्रपटात एकमेकांबरोबर स्क्रीन शेअर करत आहेत. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होईल.