टेलिव्हिजनवरील ‘खतरो के खिलाडी’ हा कार्यक्रम नुकताच पार पडला. अभिनेता करणवीर मेहराने या कार्यक्रमाच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. त्यानंतर करण अधिकच चर्चेत आला. त्याला बक्षीसस्वरुपात ३० लाख रुपये व एक अलिशान कारदेखील मिळाली आहे. अशातच आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. आता तो वादग्रस्त कार्यक्रम ‘बिग बॉस’च्या १८ व्या पर्वामध्ये एंट्री केली आहे. त्याच्या एंट्रीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ६ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस’च्या नवीन पर्वाचा ग्रँड प्रीमियर पार पडला. यामध्ये अनेक दिग्गज कलाकार दिसून आले असून यामध्ये आता चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. (karanveer mehra married life)
करणवीर आता ‘बिग बॉस’च्या घरामध्ये दिसून येत आहे. त्याच्या आधीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तो गेल्या १९ वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. त्याने अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. २००५ साली तो ‘रीमिक्स’ या मालिकेमधून काम करण्यास सुरुवात केली. अंकिता लोखंडेबरोबर ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत दिसून आला होता. तसेच ‘बाते कुछ अनकही सी’, ‘बहने’, ‘विरुद्ध’, ‘पुकार-दिल से दिल तक’ अशा अनेक मालिकांमध्ये दिसून आला. तसेच ‘रागिणी MMS 2’, ‘लव्हस्टोरी२०५०’, ‘बदमाशिया’, ‘मेरे डॅडकी मारुती’ या चित्रपटांमध्येही दिसून आला होता.
मात्र करण व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही अधिक चर्चेत राहिला. करण दोन वेळा लग्नबंधनात अडकला पण दोन्ही लग्न टिकू शकले नाहीत. त्याचे पहिले लग्न २००९ साली त्याची खास मैत्रीण देविकाबरोबर लग्नबंधनात अडकला. मात्र आठ वर्षानंतर म्हणजे २०१८ साली त्यांचे लग्न मोडले. त्यांचं नातं तुटल्यानंतर करण कोसळला होता तसेच हे नातं तुटण्याला तो स्वतःला जबाबदार समजतो. यावेळी त्याने ‘मुंबई टाइम्स’बायरोबर बोलताना सांगितले की, “लग्न केलं नसतं तर आयुष्य उद्ध्वस्त झाले नसते”.
त्यानंतर त्याने दुसऱ्यांदा २०२१ साली अभिनेतरो निधी सेठबरोबर लग्नबंधनात अडकला. पण त्यांच्यामध्ये मतभेद झाल्यामुळे २०२३ साली त्यांचं लग्न मोडले. याबद्दल त्याने सांगितले की, “आमच्यामध्ये खूप मतभेद व्हायचे. पण काही गोष्टी जास्त सहन करता येत नाहीत. यामुळे अशा नात्यात न राहता बाहेर पडलेले चांगले असते”. यानंतर निधीनेदेखील दोघांच्याही नात्यावर भाष्य केले होते. ती म्हणाली की, “लग्न करताना आर्थिकरित्या सक्षम असणे खूप महत्त्वाचे आहे.कोणत्याही नात्यात टॉक्सिकपणा असणे खूप घातक असते.” दरम्यान निधीनेदेखील घटस्फोटामागील खरे कारण सांगितले नाही. त्यानंतर ‘खतरो के खिलाडी’च्या १४ व्या पर्वात शिल्पा शिंदेबरोबर दिसून आला होता आणि त्यांच्यामध्ये काहीतरी असण्याच्या चर्चा सर्वत्र सुरु झाल्या.