मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Singham Again Trailer Out : ‘सिंघम अगेन’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, ‘रामायण’बरोबर कनेक्शन, टॉपचे कलाकार, डायलॉगबाजी अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 7, 2024 | 2:32 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
singham again trailer

'सिंघम अगेन'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या खूप चर्चेत आहे. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. २०१० साली त्याचा ‘सिंघम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तूफान कमाई केली होती. आज इतकी वर्ष उलटून गेली तरीही हा चित्रपट प्रेक्षकांच्या लक्षात राहिला आहे. यामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री काजल अग्रवाल ही मुख्य भूमिकेत दिसली होती. तसेच या चित्रपटातील सर्व गाणीदेखील प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यानंतर या चित्रपटांचे तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून सर्वच भाग तूफान चालले आहेत. अशातच आता ‘सिंघम’चा अजून एक भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (singham again trailer)

अजयचा बहुचर्चित चित्रपट ‘सिंघम अगेन’ची मोठ्या प्रमाणात चर्चा  सुरु आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यास आता काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट येण्याआधीच निर्मात्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला असून चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. ‘सिंघम अगेन’चा ट्रेलर लॉच सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा सोहळा ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’मध्ये पार पडला. यावेळी माध्यमांनी उपस्थिती दर्शवली होती. तसेच अक्षय कुमारने हा ट्रेलर रिलीज केला. या चित्रपटाचे कनेक्शन रामायणाबरोबर असल्याचेही सांगितले गेले आहे.

आणखी वाचा -“हिरोईन बनून बाहेर आले आणि…”, जान्हवी किल्लेकरची पहिलीची प्रतिक्रिया, म्हणाली, “महाराष्ट्राला माझा राग पण…”

त्याने सोशल मीडियावर ट्रेलर शेअर करत लिहिले की, “सगळ्यांनाच माहीत आहे की कोण कोण येणार आहे ते. ही दिवाळी शूर वीरांबरोबर साजरी करा. ‘सिंघम अगेन’चा ट्रेलर आला आहे. दरम्यान हा ट्रेलर समोर येताच एक इतिहास रचला आहे. हा ट्रेलर चार मिनिटे ५८ सेकंदांचा असून सर्वात मोठा ट्रेलर असल्याचेही सांगितले जात आहे. या चित्रपटात अजय देवगणसहित करीना कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ व अर्जुन कपूर हे मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

आणखी वाचा -Bigg Boss Marathi मधून मिळालेल्या लाखो रुपयांचं सूरज चव्हाण काय करणार?, म्हणाला, “बिग बॉस सारखं घर बांधणार आणि…”

दरम्यान या चित्रपटासाठी ‘सिंघम’ चाहते खूप उत्सुक आहेत. हा चित्रपट १ नोव्हेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे.    

Tags: hindi moviesingham againtrailer
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale abhijeet sawant

"मला ट्रॉफी हवी होती कारण…", अभिजीत सावंतचं मोठं वक्तव्य, म्हणाला, "सूरजसाठी खुश आहे पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.