शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता…’ मालिकेतील सोनू अखेर अडकली लग्नबंधनात, भावुक करणारा व्हिडीओ समोर, रंगली ओढणीचीच चर्चा कारण…

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 1, 2025 | 10:33 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
jheel mehta wedding video

'तारक मेहता...'मधील सोनू अडकली लग्नबंधनात

टेलिव्हीजनवरील ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही सगळ्यांचीच लोकप्रिय मालिका आहे. गेले अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. ही मालिका सुरु झाल्यापासून यातील सगळीच पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. टप्पू सेनेला विशेष प्रेम मिळाले आहे. या टप्पूसेनेतील एक अभिनेत्री आता लग्नबंधनात अडकली आहे. ही अभिनेत्री म्हणजे सगळ्यांची लाडकी सोनू अर्थात झील मेहता. झील तिचा लहानपणीचा मित्र आदित्यबरोबर  वर्षाखेरीस लग्नबंधनात अडकणार अशी सर्वत्र चर्चा सुरु होती. मार्च २०२४ मध्ये झील व आदित्यच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली होती. त्यामुळे तिचे सर्वच चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत होते. (jheel mehta wedding video)

झीलच्या लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच तिच्या लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. अभिनेत्रीने लग्नाचा व्हिडीओ तीन दिवसांनंतर सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये ते सात फेरे घेताना दिसत असून वरमाला सोहळादेखील बघायला मिळत आहे. दरम्यान हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, “तुम्हाला सर्वांना धन्यवाद व प्रेम जे आमच्या या सोहळ्यामध्ये सहभागी होते”. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये झीलने सुंदर असा लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तसेच त्यावर सुंदर अशी सोनेरी-हिरव्या आशा कॉम्बिनेशनमध्ये दागिने परिधान केले आहेत. मात्र यावेळी सगळ्यांची नजर तिच्या ओढणीवर खिळली. या ओढणीवर “हॅशटॅग झील के प्यार मे डुबे” असे लिहिले होते.

आणखी वाचा – ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील कलाकार आता काय करतात?, कसं सुरु आहे कलाकारांचं आयुष्य?, जाणून घ्या…

View this post on Instagram

A post shared by Priya Parikh | Wedding Content Creation (@sociallydreaming)

तसेच झीलचा नवरा आदित्यनेदेखील सुंदर अशी पांढऱ्या रंगाची शेरवाणी परिधान केली होती. पांढऱ्या रंगाच्या फेट्यामध्ये तो अधिकच रुबाबदार दिसत होता. या व्हिडीओमध्ये दोघंही एकमेकांना गळ्यात हार घालताना दिसत आहेत. वरमालावेळी दोघंही खूप भावुक झालेले बघायला मिळाले. लग्नबंधनात अडकल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “अंगावर काटा आला. तुमच्यासाठी खूप खुश आहे”, तसेक दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “तुम्ही दोघंही खूप गोड आहात. खूप शुभेच्छा”.

आणखी वाचा – ‘नवरा माझा…’ फेम अभिनेत्रीचा मेहंदी सोहळा थाटामाटात संपन्न, सुंदर लूकने वेधलं लक्ष, लवकरच अडकणार लग्नबंधनात, व्हिडीओ व्हायरल  

झीलच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तिने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. वयाच्या नवव्या वर्षी तिने तिची पहिली मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ केली. पुढे शिक्षण घेण्यासाठी झीलने या मालिकेतून ब्रेक घेतला. झीलचा नवरा आदित्य दुबे हा व्यवसायाने व्हिडीओ कंटेंट क्रिएटर आहे.

Tags: jheel Mehtataarak Mehta ka oolta chashmawedding video
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
aryan khan viral video

शाहरुख खानचा लेक आर्यन खानचं गर्लफ्रेंडबरोबर नवीन वर्षांचं जंगी सेलिब्रेशन, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, “नवीन वर्षात तरी…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.