‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेचे नाव घेतले जाते. ९ मार्च २०१५ रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. माजघरात राहणारे सहाजण हे वेगवेगळ्या गावांमधून आले होते. मुंबईमध्ये प्रत्येकजण काही ना काही उद्देशाने आले होते. मात्र एका घरात राहताना किती धमाल येते? सहा जणांची मैत्री कशी होते? सुखा-दु:खात एकमेकांना किती साथ देतात? हे या मालिकेमध्ये बघायला मिळाले होते. या मालिकेमध्ये अनेक नवे चेहरे बघायला मिळाले होते. सगळ्याच कलाकरांची भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडल्या होत्या. मात्र या मालिकेने २० फेब्रुवारी २०१६ साली प्रेक्षकांचा निरोप घेतला. (dil dosti duniyadari cast now)
‘दिल दोस्ती…’ या मालिकमध्ये सखी गोखले, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे, अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर, स्वानंदी टिकेकर, सुवेधा देसाई, रसिका वेंगुर्लेकर, ललित प्रभाकर हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये दिसून आले होते. मात्र हे कलाकार सध्या काय करतात? हे आपण आता जाणून घेऊया. या मालिकेमध्ये सर्वात लोकप्रिय पात्रांपैकी एक म्हणजे रेश्मा. रेश्माची भूमिका अभिनेत्री सखी गोखलेने साकारली आहे. या मालिकेमध्ये गावाकडची एक साधी, निरागस अशी भूमिका साकारली आहे. सखी सध्या नाटकांमध्ये काम करताना दिसून आली आहे. तसेच तिच्याबरोबर सुव्रतने या मालिकेमध्ये सुजय साठे ही भूमिका साकारली आहे. मालिका संपल्यानंतर सखी व सुव्रत यांच्या डेटिंगच्या चर्चा खूप रंगल्या होत्या. त्यानंतर काही वर्षातच सखी व सुव्रत लग्नबंधनात अडकले. सुव्रतच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर त्याने मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये दिसून आला होता. सध्या सखी व सुव्रत यांचे ‘वरवरचे वधुवर’ हे नाटक गाजले होते.
तसेच चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला अमेय वाघ मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्येही दिसून आला आहे. ‘अनन्या’, ‘मी वसंतराव’, ‘अश्लील उद्योग’, ‘धुरळा’ असे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. तसेच या मालिकेतील आशु ही भूमिका पुष्कराज चिरपुटकरने साकारली होती. त्याच्या विनोदी शैलीने सगळ्यांनाच पोट धरुन हसवले आहे. सध्या तो चित्रपटांमध्ये ही काम करताना दिसत आहे. ‘मुसाफिरा’, ‘बापजन्म’, ‘मी वसंतराव’ या चित्रपटांमध्ये दिसून आला होता. या वर्षी तो ‘लाइक आणि सब्स्क्राइब’ या चित्रपटामध्ये दिसून आला होता.
या मालिकेतील मिनलची भूमिका अभिनेत्री स्वानंदी टीकेकरने साकारली होती. स्वानंदी ही सध्या नाटकांमध्ये काम करताना दिसत आहे. ‘एक शून्य तीन’ या नाटकामध्ये दिसून आली होती. तसेच मराठी नाटकांमध्येही दिसून आली होती. तसेच या मालिकेमध्ये पूजा ठोंबरेदेखील मुख्य भूमिकेत दिसून आली होती. पूजाच्या अल्लड भूमिकेला चाहत्यांची खूप पसंती मिळाली होती. नंतर ती ‘चंद्रविलास’, ‘टिकळी’ या मालिकांमध्ये दिसून आली होती.