बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान हा नेहमी चर्चेत असलेला बघायला मिळतो. शाहरुखने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून त्याचे अधिकांश चित्रपट सुपरहिट असलेले बघायला मिळतात. शाहरुख त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही अधिक चर्चेत असलेला बघायला मिळाला आहे. विशेषतः शाहरुखचा मोठा मुलगा आर्यन खान चर्चेत असतो. काही दोन वर्षांपूर्वी आर्यन ड्रग्स केसमध्ये अडकला होता. त्यानंतर तो कथित गर्लफ्रेंडमुळेही चर्चेत आलेला बघायला मिळाला. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शाहरुख पत्नी गौरी व अबरामसह जामनगर येथे उपस्थित राहिलेला दिसून आला. अशातच आता आर्यन त्याची कथित प्रेयसी मॉडेल व अभिनेत्री लारिसा बोनेसीबरोबर नवीन वर्षाच्या पार्टीमध्ये दिसून आला आहे. (aryan khan viral video)
गेल्या एका वर्षापासून आर्यन व लारिसा यांच्या प्रेमाच्या अफवा सुरु आहेत. मात्र यावर अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र अनेक वेळा फिरताना, पार्टी करताना दोघांना बघितलं जातं. नुकतेच एकत्रिपणे त्यांनी नवीन वर्षांचे स्वागत केले आहे. यावेळी पुन्हा एकदा दोघांना एकत्र पाहिले गेले. आर्यन व लारिसा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघंही पार्टीमधून बाहेर पडताना दिसत आहेत. सर्वात आधी आर्यन कारमध्ये जाऊन बसतो आणि नंतर लारिसा बाहेर पडते आणि तिच्या कारमध्ये जाऊन बसते.
यावेळी आर्यन जेव्हा पार्टीमधून बाहेर पडतो तेव्हा तो तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींकडे बघतो आणि नंतर चेहरा खाली करुन निघून जातो. त्याचे असे अनेक व्हिडीओ आहेत ज्यामध्ये तो अजिबात हसताना दिसत नाही. त्यामुळे आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “भावा जरा हस रे, नवीन वर्ष आलं आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “आजवर मी याला हसताना बघितलं नाही”, तिसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “हा पूर्ण नशेत दिसत आहे”.
दरम्यान आर्यनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आर्यनच्या सध्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो ‘स्टारडम’ या वेबसीरिजमध्ये दिसून येणार आहे. या वेबसीरिजच्या चित्रीकरणामध्ये तो व्यस्त आहे. ही सीरिज या वर्षी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.