टेलिव्हीजनवरील ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही सगळ्यांचीच लोकप्रिय मालिका आहे. गेले अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. ही मालिका सुरु झाल्यापासून यातील सगळीच पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. टप्पू सेनेला विशेष प्रेम मिळाले आहे. या टप्पूसेनेतील एक अभिनेत्री आता लग्नबंधनात अडकली आहे. ही अभिनेत्री म्हणजे सगळ्यांची लाडकी सोनू अर्थात झील मेहता. झील तिचा लहानपणीचा मित्र आदित्यबरोबर वर्षाखेरीस लग्नबंधनात अडकणार अशी सर्वत्र चर्चा सुरु होती. मार्च २०२४ मध्ये झील व आदित्यच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली होती. त्यामुळे तिचे सर्वच चाहते तिच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत होते. (jheel mehta wedding video)
झीलच्या लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच तिच्या लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे. अभिनेत्रीने लग्नाचा व्हिडीओ तीन दिवसांनंतर सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये ते सात फेरे घेताना दिसत असून वरमाला सोहळादेखील बघायला मिळत आहे. दरम्यान हा व्हिडीओ शेअर करत तिने लिहिले की, “तुम्हाला सर्वांना धन्यवाद व प्रेम जे आमच्या या सोहळ्यामध्ये सहभागी होते”. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये झीलने सुंदर असा लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तसेच त्यावर सुंदर अशी सोनेरी-हिरव्या आशा कॉम्बिनेशनमध्ये दागिने परिधान केले आहेत. मात्र यावेळी सगळ्यांची नजर तिच्या ओढणीवर खिळली. या ओढणीवर “हॅशटॅग झील के प्यार मे डुबे” असे लिहिले होते.
तसेच झीलचा नवरा आदित्यनेदेखील सुंदर अशी पांढऱ्या रंगाची शेरवाणी परिधान केली होती. पांढऱ्या रंगाच्या फेट्यामध्ये तो अधिकच रुबाबदार दिसत होता. या व्हिडीओमध्ये दोघंही एकमेकांना गळ्यात हार घालताना दिसत आहेत. वरमालावेळी दोघंही खूप भावुक झालेले बघायला मिळाले. लग्नबंधनात अडकल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “अंगावर काटा आला. तुमच्यासाठी खूप खुश आहे”, तसेक दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “तुम्ही दोघंही खूप गोड आहात. खूप शुभेच्छा”.
झीलच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर तिने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. वयाच्या नवव्या वर्षी तिने तिची पहिली मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ केली. पुढे शिक्षण घेण्यासाठी झीलने या मालिकेतून ब्रेक घेतला. झीलचा नवरा आदित्य दुबे हा व्यवसायाने व्हिडीओ कंटेंट क्रिएटर आहे.