‘कुमकुम’ ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका राहिली आहे. ही मालिका २२ वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला येत असे. या मालिकेत मुख्य भूमिका सकारणारे जुही परमार व हुसैन यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली होती. या मालिकेने ७ वर्ष चाहत्यांचे मनोरंजन केल्यानंतर १५०० भाग २००९ साली प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता या मालिकेला २२ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने ‘कुमकुम’ या मालिकेच्या चाहत्यांना एक गिफ्ट मिळाले आहे. कुमकुम व सुमित इतक्या वर्षांनी एकत्र आलेले दिसून आले आहेत. (kumkum serial couple dance)
‘कुमकुम’ या गाजलेल्या मालिकेतील जुही व हुसैन या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले होते. आता पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत. नुकताच दोघांचाही एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ते आमिर खान व रानी मुखर्जी यांच्या चित्रपटातील ‘आंखो से तुने” या गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडीओ करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “२२ वर्षांपूर्वी आम्हाला माहीत नव्हते की हा इतका मोठा दिवस असेल आणि येणाऱ्या काही वर्षात आम्ही हे मानत राहू. तुम्ही सर्वांनी कुमकुम व सुमित यांच्या जोडीला किती प्रेम केले आहे आणि यापुढेही करत राहाल.
पुढे त्यांनी लिहिले की, “हे तुमचे प्रेम आहे ज्यामुळे आम्ही दरवेळीही आम्ही एकत्र येऊ. तुम्ही आमच्यावर असंच प्रेम कराल पण आजवर तुम्ही आमच्याबरोबर आहात यासाठी सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत. हे या सगळ्यांसाठी आहे जे सुमित व कुमकुमचे चाहते आहेत. चाहते अजूनही त्यांना एकत्र पाहण्याची इच्छा बाळगत आहेत. त्यामुळे पुन्हा आम्ही तुमच्यासमोर आलो आहोत. तुमच्याबरोबर आम्ही आमचे प्रेमाचे बंधन शेअर करत आहोत”. चाहत्यांनी या रीलला खूप पसंती दिली आहे. तसेच अनेक नेटकरी पुन्हा एकदा ही जोडी समोर यावी अशी प्रतिक्रियादेखील देत आहे.
या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे की, “हे खरंच पती-पत्नीसारखे दिसत आहेत”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया दिली की, “ही जोडी खूप सुंदर आहे”. दरम्यान ही मालिका त्या वेळी खूप अधिक प्रसिद्ध होती. आजही या मालिकेतील सर्व भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही राज्य करत आहेत.