अमेरिकन रिॲलिटी टीव्ही स्टार किम कार्दशियन आणि तिची बहीण ख्लो कार्दशियनने मुंबईत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्यात सहभाग घेतला. किमने सेलिब्रेशनचे नवीन फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले, ज्यामध्ये तिने पांढरा व सोनेरी रंगाचा मनीष मल्होत्रा लेहेंगा व चोळी घातली होती. यानंतर आता किम कार्दशियन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. Reddit वरील एका पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, किमने गणपतीच्या मूर्तीबरोबर तिचा फोटो शेअर केला होता. तिच्या या फोटोवर जोरदार टीका झाल्यानंतर किमने तिची इन्स्टाग्राम पोस्ट काढली. (Kim Kardashian troll)
किम कार्दशियनने गणपती बाप्पांबरोबरचा फोटो हटवून तिथे तिचा देसी लूक शेअर केला आहे. या फोटोला त्याने कॅप्शन देत असे लिहिले आहे की, “अंबानींच्या लग्नासाठी हिरे व मोती”. पण लोकांच्या तीक्ष्ण नजरेने तो डिलीट केलेला फोटोही हेरला आणि आता तो फोटो सध्या व्हायरल झाला आहे. किमच्या फोटोबद्दल एका Reddit पोस्टमध्ये असं सांगण्यात आलं की, अंबानींच्या लग्नाच्या उत्सवादरम्यान किमचा चेहरा गणेशाच्या मूर्तीवर ठेवून तिने फोटो काढला. एका नेटकऱ्याने यावर कमेंट करत असं म्हटलं की, “भारतीय संस्कृतीचा अपमान सहन करणार नाही”.
या पोस्टखाली नेटकऱ्यांनी कमेंट करत संताप व्यक्त केला आहे, “किम तिचे फोटो क्लिक करण्यासाठी गणेशाचा वापर करत आहे. अंबानींच्या लग्नाची सांगता. या महिलेला लवकरात लवकर शिक्षा व्हायला हवी. नीता आंटी, तुमच्या पाहुण्यांना शिकवा”, अशा अनेक प्रतिक्रिया किमचा गणपतीच्या मूर्तीबरोबरच्या फोटो पोस्टवर दिल्या आहेत. तर एकाने लिहिले, “तिने ही पोस्ट काढली हे तिच्यासाठी चांगले आहे”.
एकाने असेही म्हटले आहे की, “यामुळे तिला भारतीय प्रेक्षकांकडून कोणताही पाठिंबा मिळण्यास मदत होणार नाही ज्याच्या ती शोधत आहे. काय मूर्खपणा”. ११ जुलै रोजी, किम व ख्लो अनंत-राधिकाच्या राजेशाही लग्नसोहळ्यासाठी मुंबईत पोहोचले आणि पारंपरिक आरतीने त्यांचे भारतात स्वागत करण्यात आले.