टेलिव्हिजनवरील आवडती मालिका ‘बडे अच्छे लगते है’ ही आजही प्रेक्षकांच्या खूप लक्षात आहे. अभिनेता राम कपूर व अभिनेत्री साक्षी तन्वर यांची मुख्य भूमिका असणाऱ्या मालिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. २०११ ते २०१४ या कालावधीमध्ये ही मालिका प्रदर्शित व्हायची. मात्र ही मालिका लवकर संपल्याने प्रेक्षकांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला होता. अशातच आता या मालिकेबद्दलची नवीन अपडेट समोर येत आहे. १० वर्षानंतर ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ११ नोव्हेंबरपासून ‘बडे अच्छे…’ मालिका पुन्हा बघता येणार आहे. सोनी टीव्हीने अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. यामध्ये मालिकेबद्दल घोषणा करण्यात आली आहे. (bade acche lagte hain serial update)
लोकप्रिय मालिका ‘बडे अच्छे…’ प्रोमो समोर आला असून यामध्ये राम व साक्षी दिसून येत आहेत. यामध्ये दोघंही समान खरेदी करत आहेत तर एकमेकांबरोबर बोलतानादेखील दिसत आहेत. तसेच हा प्रोमो शेअर करत लिहिले आहे की, “पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या जोडीला भेटा. बघा #बडेअच्छेलगतेहै, ११ नोव्हेंबरपासून रात्री ८.३० वाजता, फक्त #सोनीएंटरटनमेंटटेलिव्हिजवर”. हा प्रोमो समोर येताच नेटकऱ्यांनी प्रतिरकिया देण्यास सुरुवात केली असून प्रेम दर्शवले आहे.
एकता कपूर निर्मित ‘बडे अच्छे…’ मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग होता. हटके कथेने सगळ्यांचेच लक्ष वेधले. प्रिया शर्मा व राम कपूर यांच्याबद्दलची ही गोष्ट असून प्रेक्षकांना खिळवून ठेवते. सुरवातीला एकमेकांचा तिरस्कार करणारे लग्नानंतर त्यांच्यामधील प्रेम कसं वाढत जातं? याबद्दल दाखवण्यात आले आहे.
या मालिकेमध्ये सुमोना चक्रवर्ती, मोहित मल्होत्रा, चाहत खन्ना, ईवा ग्रोव्हर, जय कालरा असे अनेक कलाकार होते. ११ नोव्हेंबर पासून ही मालिका रात्री ८.३० वाजता पुन्हा एकदा भेटीस येणार आहे. २०२१ साली देखील ‘बडे अच्छे लगते है २’ ची घोषणा करण्यात आली होती. दुसऱ्या भागांमध्ये नकुल मेहता व दिशा परमार मुख्य भूमिकेत होते. तसेच २०२३ साली तिसरा भागदेखी प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र जास्त काळ सुरू राहू शकला नाही.