Neha Gadre Pregnancy Good News : सिनेसृष्टीत अशी अनेक कलाकार मंडळी आहेत ज्या कला विश्वाला रामराम करत संसारात रमल्या. बॉलीवूड पासून ते अगदी मराठी कलावकरांपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहे ज्या लग्नानंतर परदेशात स्थायिक झालेल्या पाहायला मिळाल्या. अभिनयक्षेत्र सोडून ही कलाकार मंडळी परदेशात स्थायिक झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. अशातच एक मराठमोळी अभिनेत्री म्हणजेच नेहा गद्रे. नेहा काही दिवसांपासून चर्चेत असलेली पाहायला मिळतेय. काही वर्षांपूर्वी नेहाने तिच्या पतीसह परदेशात राहण्याचा निर्णय घेतला आणि तिने मालिका विश्वाला आणि चित्रपटसृष्टीला रामराम केला. गेली बरेच वर्ष नेहा मालिका विश्वात कार्यरत नसल्याचं पाहायला मिळत आहे.
‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘अजूनही चांदरात आहे’ या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच नेहा गद्रे. याशिवाय ‘गडबड झाली’, ‘मोकळा श्वास’ या चित्रपटांमधून नेहाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना नेहाने मालिका विश्वातून काढता पाय घेत अभिनय सृष्टीतून ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळालं आणि नेहा ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाली. ईशान बापट बरोबर लग्न झाल्यानंतर तिने संसाराकडे विशेष लक्ष दिलं. इतकंच नव्हे तर दोन वर्षांपूर्वी नेहाने ऑस्ट्रेलियात राहूनही शिक्षिकेची पदवी मिळवली. ऑस्ट्रेलियात स्थायिक असलेली नेहा सध्या चर्चेत आली आहे ती म्हणजेच लवकरच नेहा आई होणार आहे.
आई होणार असल्याची गुडन्यूज तिने चाहत्यांना दिली. तिने आपल्या नवऱ्याबरोबर बेबी बंब दाखवत गोड व्हिडीओ शेअर केला. समुद्रकिनारी फोटोसाठी पोज देताना ही जोडी पाहायला मिळाली. त्यानंतर आता नेहाने शेअर केलेला आणखी एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. नेहाने तिच्या डोहाळ जेवणाचा खास व्हिडीओ सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. मात्र, या डोहाळे जेवणाच्या व्हिडीओमध्ये एका गोष्टीने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये नेहा व तिचा पती ईशान बाळाच्या जन्माआधीच जेंडर रिव्हील करताना दिसत आहेत.
आणखी वाचा – भर दिवाळीमध्ये माधुरी दीक्षितसह घडला होता ‘हा’ प्रसंग, केसही जळले होते अन्…; अभिनेत्रीनेच केला खुलासा
बाळाच्या जन्माआधी लिंग चाचणी करणे भारतात बेकायदेशीर आहे मात्र विदेशात याला परवानगी आहे. त्यामुळे नेहाने मुलगा होणार की मुलगी हे खुलेआमपणे या व्हिडीओमधून सांगितलं असल्याचे दिसतेय. बेबी बापट कोण असेल?, तुम्हा सगळ्यांसमोर रिव्हील करण्याची हिचं योग्य वेळ आहे”, असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. पांढऱ्या रंगाचा सुंदर असा गाऊन, डोक्यावर तिआरा घालून नेहा अगदी राजकुमारीसाठी तिच्या डोहाळ जेवणासाठी तयार झालेली दिसली. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शेवटी निळ्या रंगाची वाफ सर्वत्र पसरल्याचे दिसत आहे आणि यावरुनच अभिनेत्रीला मुलगा होणार असल्याचे स्पष्ट झालं. मुलगी होणार असेल तर गुलाबी रंग आणि मुलांसाठी जेंडर रिव्हील करताना निळ्या रंगाचा वापर केला जातो. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी व कलाकार मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे.