टेलिव्हिजनवरील अभिनेत्री संभावना सेठ ही नेहमी चर्चेत असलेली बघायला मिळते. सध्या ती ४३ वर्षांची असून तिच्यापेक्षा सहा वर्षांनी लहान असलेल्या अविनाश द्विवेदीबरोबर लग्न केले. नवऱ्याबरोबर ती खूप खुश असलेलीदेखील दिसून येते. मात्र आई होऊ न शकल्याची खंतमात्र तिच्या मनात खूप आहे. आई न झाल्याने तिला अनेकांचे टोमणेदेखील ऐकावे लागल्याचे व्लॉगच्या माध्यमातून सांगितले होते. ती गरोदरदेखील राहिली होती. तीन महिन्यांची गरोदर असतानाच तिचा गर्भपात झाल्याचे समोर आले. यावरुन ती खूप भावुक झालेलीदेखील दिसून येत आहे. गरोदर असल्याची गोड बातमी ती चाहत्यांबरोबर शेअर करणार असतानाच ही दुर्दैवी बातमी सांगितली आहे. (sambhavna seth miscarriage)
संभावना व अविनाश यांनी १९ डिसेंबर २०२४ रोजी एक व्लोग शेअर केला. यामध्ये त्यांनी गर्भपात झाल्याची दु:खद घटना चाहत्यांना सांगितली. आठ वर्षांपूर्वी दोघंही लग्नबंधनात अडकले होते. तसेच गेल्या अनेक काळापासून ते बाळासाठीदेखील प्रयत्न करत होते. या शेअर केलेल्या व्लोगमध्ये अविनाश म्हणतो की, “संभावना तीन महिन्यांची गरोदर होती. ही गुडन्यूज आम्ही शेअर करणारच होतो. आम्ही खूप काळजी घेतली होती. पण कदाचित देवाच्या मनात काहीतरी वेगळंच असावं. संभावनाचा गर्भपात झाला”.
पुढे तो म्हणाला की, “सगळं सुरळीत सुरु होतं. जुळी मुलं असू शकतील असंही डॉक्टर म्हणाले होते. आम्ही खूप खुश होतो. आम्ही विचार करत होतो की सगळं खूप छान होणार आहे. तिचे गरोदरपण हे तिच्याच शरीरासाठी धोकादायक होते म्हणून संभावनाचा गर्भपात करावा लागला. गेल्या तीन महिन्यांपासून संभावनाने खूप काही सहन केले आहे. या सगळ्या उपचारादरम्यान तिने ६५ इंजेक्शन घेतली आहेत. हे खूप भयानक होतं. पण तिने मुलांच्या सुखासाठी सगळं सहन केलं”.
याबरोबरच संभावना सेठने एकदा सांगितले होते की तिने आणि पती अविनाश यांनी अनेक वेळा आयव्हीएफ करण्याचा प्रयत्न केला, पण अपयशी ठरले. त्याने त्याची एग्स फ्रीजदेखील केली होती. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. नंतर संभावनाने सरोगसीचा मार्ग निवडला.