०४ डिसेंबर रोजी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरला झालेल्या चेंगराचेंगरीत ३५ वर्षीय महिला रेवती यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा आठ वर्षांचा मुलगा श्री तेजा गंभीर जखमी झाला, त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तो आपल्या जीवनाशी झुंज देत आहे. या प्रकरणी अल्लू अर्जुनला अटकदेखील झाली. पण अवघ्या काही तासांत त्याची जामिनावर सुटका झाली. अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर मनोरंजन सृष्टीतून अनेक संमिश्र प्रतिक्रिया समोर आल्या. अशातच आता दिग्दर्शक व निर्माते राम गोपाल वर्मा यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. (Ram Gopal Varma on Allu Arjun’s arrest)
राम गोपाल यांनी सर्व कलाकारांना अल्लू अर्जुनच्या अटकेचा निषेध करण्याचे आवाहनदेखील केले अआहे आणि या दुःखद घटनेची तुलना दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या ‘क्षन क्षनम’ चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या घटनेशी केली आहे. त्यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले आहे की, “प्रत्येक कलाकाराने अल्लू अर्जुनच्या अटकेचा तीव्र निषेध केला पाहिजे. कारण कोणत्याही सेलिब्रिटीसाठी, मग तो चित्रपट स्टार असो किंवा राजकीय स्टार, त्यांच्यासाठी इतके प्रसिद्ध होणे हा गुन्हा आहे का?”
Every STAR should STRONGLY protest against @alluarjun ‘s ARREST because for any celebrity whether it’s a FILM STAR or a POLITICAL STAR , is it a crime for them to be ENORMOUSLY POPULAR???
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) December 19, 2024
3 people died in the lakhs of crowd who came to see SRIDEVI in the shooting of my film…
यापुढे ते असं म्हणाले की, “माझ्या ‘क्षण शनम’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान श्रीदेवीला पाहायला आलेल्या लाखोंच्या गर्दीत तीन जणांचा मृत्यू झाला. तर आता तेलंगणा पोलीस श्रीदेवीला अटक करण्यासाठी स्वर्गात जाणार का?” त्यामुळे आता अल्लू अर्जुनच्या कायदेशीर कारवाईमागील तर्कावर त्यांनी टीका केली.
आणखी वाचा – Tula Shikvin Changlach Dhada मालिकेत सुरु होणार नवा अध्याय, अक्षरा देणार गरोदरपणाची खुशखबर, प्रोमो व्हायरल
१३ डिसेंबरला ‘पुष्पा’ अभिनेत्याला अटक झाली आणि चंचलगुडा सेंट्रल जेलमध्ये रात्र काढावी लागली. न्यायालयाने सुरुवातीला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असले तरी नंतर तेलंगणा उच्च न्यायालयाने त्याला चार आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला.
आणखी वाचा – उस्ताद झाकीर हुसैन अनंतात विलीन, परदेशात पार पडले अंत्यसंस्कार, कुटुंबियांनी जड अंत:करणाने दिला निरोप
दरम्यान, दिवंगत महिला चाहतीचा मुलगा सध्या व्हेंटिलेटरवर असल्याचेही अलीकडील अहवालातून स्पष्ट झाले आहे. अभिनेत्याने मृताच्या कुटुंबाला २५ लाख रुपये देण्याचे वचन दिले आहे, नुकतीच त्याचे वडील अल्लू अरविंद यांनी रुग्णालयात जखमी मुलाची भेट घेतली. मुलाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची पुष्टी अरविंद यांनी दिली आहे.