सध्या सोशल मीडियावर सर्वत्र बॉलिवूड कलाकारांच्या मुलांच्या स्नेहसंमेलनाची चर्चा सुरु आहे. गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये कलाकार त्यांच्या मुलांना सपोर्ट करण्यासाठी पोहोचले. यावेळी ऐश्वर्या आणि अभिषेक ही जोडीही लेकीच्या शाळेत पोहोचल्याचं पाहायला मिळालं. आपल्या लेकीला प्रोत्साहन देण्यासाठी हे स्टार जोडपं एकत्र पोहोचलं होतं. यावेळी आराध्याचे आजोबा ‘बिग बी’सुद्धा उपस्थित होते. अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी यावेळी काळ्या रंगाचे कपडे घालून ट्विनिंग केलं होतं. आराध्याच्या शाळेत बच्चन कुटुंबीय एकत्र सहभागी झालं होतं आणि याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसला. अशातच आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. (kareena kapoor and shahid kapoor viral photo)
अभिनेत्री करीना कपूर व सैफ अली खान हे तैमुरसाठी पोहोचले होते. करीनाची बहीण करिश्मा कपूरदेखील मुलांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचली. याचवेळी शाहिद कपूर व पत्नी मीरा राजपूतदेखील दिसून आले. हे दोघंजण मिशा व जैन यांना सपोर्ट करण्यासाठी पोहोचले होते. याव्यतिरिक्त कार्यक्रमातील एका दृश्याने सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. शाहिद व करीना यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
दरम्यान व्हायरल झालेल्या फोटोमध्ये शाहिद करीनाच्या मागे बसलेला दिसून येत आहे. या जोडीला पुन्हा एकत्रित पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. सगळ्यांना ‘जब वी मेट’ या चित्रपटातील गीत व आदित्यची आठवण आली. या फोटोवर चाहत्यांनी प्रतिक्रिया देण्यासही सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “हे दृश्य खूप छान आहे. बेबो व शाहीद एकाच फ्रेममध्ये”. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “बॉलिवूड एकाच ठिकाणी आहे. यांना शांत बघून बरं वाटत आहे”.
शाहिद व करीनाचा फोटो पाहून ‘जब वी मेट’ चित्रपटाच्या सगळ्या आठवणी चाहत्यांनी ताज्या केल्या आहेत. गीत व आदित्य ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. हे आठवत एका नेटकऱ्याने लिहिले की, “ते नेहमीच गीत व आदित्य राहतील”. तसेच दुसऱ्या एकाने मस्करीत लिहिले की, “गीत व आदित्य आता त्यांच्या मुलाला वेगवेगळ्या लोकांबरोबर बघत आहेत”. या व्हिडीओला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे.