शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“त्याने माझ्या खांद्याला पकडलं अन्…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीला चित्रपटामध्ये काम करण्यासाठी गेल्यानंतर विचित्र वागणूक, म्हणाली, “तो म्हातारा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 8, 2024 | 8:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sreejita de on casting couch

"त्याने माझ्या खांद्याला पकडलं अन्...", सुप्रसिद्ध अभिनेत्रीला चित्रपटामध्ये काम करण्यासाठी गेल्यानंतर विचित्र वागणूक, म्हणाली, "तो म्हातारा..."

लहान पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री व ‘बिग बॉस १६’ ची स्पर्धक श्रीजिता आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत असते. २००७ मध्ये तिने ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण केले. त्यानंतर तिला ‘उतरन’ या चित्रपटातून अधिक प्रसिद्धी मिळाली. २००८ पासून २०१५ या कालावधीमध्ये सुरू असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी अधिक पसंती दर्शवली. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये श्रीजिताने कास्टिंग काऊचवर भाष्य केले आहे. (Sreejita de on casting couch)

मालिकाविश्वात येण्यासाठी ती अनेक ठिकाणी ऑडिशन देत होती. अशाच एका ऑडिशनदरम्यानचा एक किस्सा तिने शेअर केला आहे. तिने यामध्ये कास्टिंग काऊचचा सामना करावा लागल्याचे सांगितले. ती म्हणाली की, “जेव्हा मी १९ वर्षाची होते तेव्हा मला एका नंबरवरुन फोन आला आणि मला एक बंगाली चित्रपटाची ऑफर दिली. हा चित्रपट एका हिंदी चित्रपटाचा रिमेक असल्याचे सांगितले. मला मीटिंगसाठी बोलावलं. माझी आई कोलकात्यामध्ये होती. मी एकटीच दिग्दर्शकाला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसमध्ये गेले. तेव्हा त्याने माझा खांदा पकडला. त्याने खांदा पकडल्यानंतर मला थोडं विचित्र वाटलं, मला ते आवडलं नाही”.

आणखी वाचा – Video : पार्टीमध्ये अंबानींच्या सूनेने केलेलं भाषण हॉलिवूड चित्रपटाच्या डायलॉग्सची कॉपी, व्हिडीओ व्हायरल होताच ट्रोल

View this post on Instagram

A post shared by Sreejita De Blohm-Pape (@sreejita_de)

पुढे ती म्हणाली की, “तो म्हातारा होता.वयाने लहान असलं तरीही असा स्पर्श कोणालाही योग्य वाटणार नाही.  तसेच तो माझ्याकडे ज्या प्रकारे बघत होता तेही खूप घाणेरडं होतं. मी त्या क्षणी माझी पर्स उचलली आणि ऑफिसमधून पळून गेले”.

आणखी वाचा – “उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी असल्याचं भान ठेवा”, अमृता फडणवीसांचा हॉट लूक पाहून भडकले लोक, म्हणाले, “हिंदू संस्कृतीला…”

याबरोबरच तिने मनोरंजन क्षेत्रातील अनुभवही शेअर केला. ती म्हणाली की, “या क्षेत्रात कारणाशिवाय मला फोन करतात आणि त्यांच्याकडे मोठ मोठे चित्रपट असल्याचा दावा करतात. पण खरं तर त्यांच्या काहीच नसते. ते फक्त भेटायला बोलावतात. काहीजण हेही म्हणतात की आमच्याकडे मोठ्या निर्मात्यांचे चित्रपट आहेत. पण यामध्ये कास्टिंग काऊच आहे. हे माझ्याबरोबर एक-दोन वेळा घडले आहे”.

कास्टिंग काऊचवर व्यक्त होताना ती म्हणाली की, “मला आश्चर्य वाटते की लोकांची अशी मानसिकता कशी काय असू शकते? पण मी यांच्या बोलण्यात कधीही आले नाही. मी धीट होते. मला माहीत होते की जिथे चांगले काम आहे तिथे चुकीचे लोक असणार नाहीत. मी नेहमी म्हणते की जिथे खरे काम असते तिथे कास्टिंग काऊच नसतो”.

श्रीजिता आजपर्यंत ‘तुम्ही हो बंधु सखा तुम्ही’, ‘लेडीज स्पेशल’, ‘लाल इश्क’, ‘जादू है जिन का’या लोकप्रिय कार्यक्रमांमध्ये दिसून आली होती.

Tags: casting couchhindi actressHindi serialsreejita destruggletelevision actresstv serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Next Post
Today 9th march panchang mesh to meen rashi bhavishya see the details

आजचे राशीभविष्य : मेष ते मीन या राशींमध्ये कुणाचे नशीब अधिक चांगलं?,आर्थिक व शैक्षणिक यश कोणाला मिळणार?, जाणून घ्या…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.