राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजकारणी असल्यामुळे कायम चर्चेत असतात. ऑन देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचीही चर्चा असते. त्या सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. अशातच आज जागतिक महिला दिनाचे खास औचित्य साधत अमृता यांनी त्यांच्या सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावरील त्यांचे हे स्टायलिश फोटो पाहून नेटकरी पार सैराट झाले आहेत. त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोवर नेटकऱ्यांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काही जणांनी तर अमृता फडणवीस यांची खिल्ली देखील उडवली आहे.
अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे महिला दिनानिमित्त खास स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. अमृता यांनी सोनेरी रंगाचा वेस्टर्न स्टाइल असलेला ड्रेस परिधान करत हटके फोटोशूटही केलं आहे. “हे स्त्री मुलगी हो” असं म्हणत त्यांनी हे फोटो पोस्ट केले आहेत. तसेच या फोटोसह त्यांनी महिला दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. मात्र अमृता यांनी शेअर केलेल्या या फोटोमुळे त्या सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल होत आहेत.
आणखी वाचा – अमृता खानविलकरला ‘या’ तीन व्यक्तींशिवाय जमेना, आईही सतत असते पाठिशी, म्हणाली, “माझ्यासाठी संपूर्ण जग…”
अमृता यांनी सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट करताच या फोटोखाली अनेक नेटकऱ्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांनी या फोटोवर “मामींचं खरं हिंदुत्व हेच आहे का?, अध्यक्ष महोदय हे काय पाहतोय आम्ही?, तुम्ही कोण आहात आणि काय करत आहात? याचं भान असलं पाहिजे, तुम्ही एका उपमुख्यमंत्र्यांची व माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहात याचे भान ठेवा, विदेशी संस्कृती जपणारी उपमुख्यमंत्र्यांची बायको” अशा अनेक नकारात्मक प्रतिक्रिया ववीकट केल्या आहेत.

याउलट अनेकांनी त्यांच्या या फोटोशूटचे कौतुकही केले आहे. “खूपच छान, खूपच सुंदर, अतुलनीय तारुण्य, अद्वितीय सौंदर्य, स्मार्ट दिसत आहात, रिहानापेक्षा तर भारीच दिसत आहात” अशा अनेक कमेंट्स करत अनेकांनी त्यांना महिला दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनी या फोटोला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसादही दिला आहे.