टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. आजवर तिने अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ती आपल्या चाहत्यांबरोबर संपर्कात असते. श्वेताचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मात्र अभिनयाबरोबर तिच्या अफेअर्सची चर्चादेखील अधिक रंगते. सध्या टेलिव्हिजन अभिनेता फहमान खानबरोबर अफेअरची चर्चा रंगली होती. मात्र आता अभिनेत्याने यावर भाष्य केले असून खूप चर्चेत आले आहे. फहमानने श्वेता व त्याच्या नात्यावर भावनादेखील व्यक्त केली आहे. यामुळे आता श्वेता अधिक चर्चेत आली आहे. (shweta tiwari affair)
फहमान हा ‘इमली’ या मालिकेतून अधिक प्रकाशझोतात आला. तो नेहमी त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. मध्यंतरीच्या काळात श्वेता व फहमान एकमेकांना डेट करत असल्याचे समोर आले होते. मात्र ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. अशातच पुन्हा एकदा दोघांच्या अफेअरची चर्चा सुरु झाली. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये फहमानने श्वेता व त्याच्या नात्याबद्दलची प्रतिक्रिया दिली आहे. मुलाखतीदरम्यान त्याला विचारले की, “ ‘मेरे डॅड की दुल्हन’च्या वेळी तुझ्या व श्वेताच्या नात्याबद्दल खूप अफवा सुरु झाल्या होत्या. त्यावेळी खरच तुम्ही रिलेशनशिपमध्ये होतात का?”, त्यावर फाहमानने सांगितले की, “हे खरं नाही. आमचे नातं कसं आहे हे आम्हाला माहीत आहे. मी त्यांना गुरु मानतो. चांगली मैत्रीण आहे माझी ती. आमचा बॉंड चांगला होता आणि आम्ही एकमेकांबरोबर खूप साऱ्या गोष्टी शेअर करायचो”.
पुढे तो म्हणाला की, माझी रिलेशनशिप्स खूप वेगळी असतात. मला वाटतं की आपण ज्या ठिकाणी काम करत आहोत तिथे कोणाला डेट करु नये. असे केले तर त्याचा तुमच्या कामावर खूप परिणाम होऊ शकतो. मी जेव्हा करोनाच्या वेळी बिल्डिंगच्या खाली गेलो होतो तेव्हापासून आमच्याबद्दलच्या चर्चा सुरु झाल्या. कारण ती वेळ अशी होती की तुम्ही जर असे करत असाल तर तुमचे त्या व्यक्तीबरोबर खूप खास नातं असेल. पण आम्हाला या गोष्टींचा फरक पडत नाही. आम्ही अशा गोष्टी ऐकल्या तर हसतो”.
श्वेताच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर नुकतीच ती ‘मित्रा दा ना चलदा’ या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. त्याचप्रमाणे ती विवेक ओबेरॉयबरोबर ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेबसीरिजमध्ये दिसून आली होती.