बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नेत्राच्या पोटात वाढतोय विरोचकाचा अंश, विरोचकाच्या नवीन शक्तीने राजाध्यक्ष हैराण, काय असेल देवीआईच्या लेकींचं पुढचं पाऊल  

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 19, 2024 | 5:44 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi Marathi serial new twist that Virochaka's baby is growing in Netra's stomach.

नेत्राच्या पोटात वाढतोय विरोचकाचा अंश, विरोचकाच्या नवीन शक्तीने राजाध्यक्ष हैराण, काय असेल देवीआईच्या लेकींचं पुढचं पाऊल

झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत एकामागोमाग येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. रहस्यमय कथेवर आधारित असलेली ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेचे कथानक, मालिकेतील कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका एका उंचीवर पोहोचली आहे. मालिकेत सध्या नेत्रा गरोदर असून तिच्या पोटात विरोचकाचा अंश वाढत असल्याचा नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

गेले काही दिवस राजाध्यक्षांच्या घरात अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. नेत्राच्या पोटात वाढत असलेलं बाळ हे विरोचकाचा अंश असल्याचे कळताच राजाध्यक्षांच्या कुटुंबात गंभीर वातावरण तयार झालं आहे. गेले अनेक दिवस विरोचक राजाध्यक्षांविरुद्ध अनेक नवीन चाली खेळत आहेत. मात्र विरोचकाच्या प्रत्येक कटकारस्थानाला राजाध्याक्ष एकजुटीने लढा देत आहेत. विरोचकाच्या शक्तीविरुद्ध त्यांनी एकत्र लढा दिल्यानंतर त्यांना आता नवीन धक्का मिळाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – श्वेता तिवारीबरोबर अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचं भाष्य, खुलासा करत म्हणाला, म्हणाला, “आम्ही एकमेकांबरोबर…”

अशातच आता या मालिकेचा नवीन प्रोमो आला आहे, ज्यामध्ये नेत्रा व इंद्राणी एकत्र एका श्लोकाचे वाचन करतात. ज्यामध्ये असं लिहिलेलं असतं की, “गर्भधारणा अवस्था प्राथमिक अवस्थेत असताना शिशु गतजन्मी विरोचकाचा पुत्र म्हणून आसुरी शक्तींकडे ओढ घेईल. यापुढे शेखर राजाध्यक्ष विरोचकाचा अंश नेत्राच्या पोटात वाढत असल्याचे अद्वैतला सांगतो. हे ऐकून अद्वैतलादेखील मोठा धक्का बसतो. यापुढे इंद्राणीही नेत्राला तिच्या पोटी विरोचकाचे बाल जन्माला येणार असल्याचे सांगते. मालिकेचा हा नवीन प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – मुस्लिम मुलाबरोबर लग्न करणार असल्याचं कळलं अन्…; सोनाक्षी सिन्हानेच केला वडिलांच्या प्रतिक्रियेचा खुलासा, अभिनेत्री म्हणाली…

दरम्यान,  या नवीन प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  देवीआई नेत्राला यातून काय नवीन मार्ग दाखवणार? आणि विरोचकाचा वध नक्की कुणाच्या हातून होणार? राजाध्यक्ष कुटुंबीय या धक्क्यातून सावरणार का? हे आगामी भागांत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी भागांसाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.     

Tags: marathi entertainment newsmarathi serialSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
sanchita ugale passed away
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं टोकाचं पाऊल, घरीच गळफास घेत आत्महत्या, चित्रपटसृष्टीही हादरली

जून 15, 2026 | 2:42 pm
Next Post
Pooja Batra Career

प्रेमासाठी करिअरचा त्याग अन् घटस्फोट; लग्नानंतर परदेशात स्थायिक झाल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं तुटलं लग्न, आता जगत आहे असं आयुष्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.