हिंदी टेलिव्हिजन व मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या सेठ शाह सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिची मुलगी मिहीकाचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी दिव्या यांनी मुलगी या जगात नसल्याचे सोशल मीडियाच्या माध्यामातून सांगितले होते. कमी वयात मिहीकाचे निधन झाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मुलीचे निधन झाल्याची माहिती स्वतः दिव्या यांनी दिली. ५ ऑगस्ट २०२४ रोजी तिला खूप ताप आला आणि त्यातच तिला अटॅक आल्याने तिचे निधन झाले. तिचे निधन झाल्याने संपूर्ण कुटुंबालाच धक्का बसला.(divya seth shah emotional post)
नुकतीच मिहीकची शोकसभा झाली. आता दिव्या यांनी स्वतः सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये एक फोटो शेअर करत त्यांनी ‘धन्यवाद. माझी झाल्याबद्दल”. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेकांनी त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्यांना धीर दिला आहे.
अभिनेता रोनित रॉयने दिव्या यांच्या मुलीला श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिले की, “तू दुसऱ्या आई-वडिलांच्या पोटी जन्म घेतला आहेस. मात्र तू नेहमी माझी मुलगी राहशील. मी आतापर्यंत जितक्या लोकांना ओळखतो त्यांच्यपैकी तू माझी संवेदनशील मुलगी आहेस. मला अजून आठवतय की तुझ्या आईला वाढदिवसाची भेट देण्यासाठी किती उत्साही होतीस ते. जेव्हा तू बाय रोहित पापा बोललीस तेव्हा असं काही होईल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. पण तुझ्या आई वडिलांच्या पोटी तू पुन्हा जन्म घे”.
पुढे तो म्हणाला की, “तू जिथे आहेस तिथे व्यवस्थित राहा. लवकरच मी तुला भेटेन बाळा मिहीका”. दरम्यान मिहीकाच्या जाण्याने सर्वच कलाकारांना धक्का बसला आहे. दिव्या यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर त्या टेलिव्हिजनमधील एक आघाडीच्या अभिनेत्री आहेत. तसेच चित्रपटांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘जब वी मेट’, ‘इंग्लिश विंग्लिश’, ‘दिल धडकने दो’, ‘आर्टिकल ३७०’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ‘द मॅरीड मॅन’, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ व ‘दुरंगा’ अशा वेबसिरिजमध्येही दिसून आल्या आहेत.