Devoleena Bhattacharjee : ‘साथ निभाना साथिया’ फेम अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी यांनी काही काळापूर्वी तिच्या मुलाबरोबरचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. तेव्हापासून, नेटकरी अभिनेत्रीला ट्रोल करताना दिसत आहेत. अभिनेत्रीच्या मुलाच्या गडद रंगावरून ते ट्रोल करीत आहेत. जेव्हा देवोलिनाने आपल्या मुलासह फोटो शेअर केले तेव्हा नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर तिच्या मुलाची चेष्टा करण्यास सुरुवात करतात. अशा परिस्थितीत, आता अभिनेत्रीने ट्रोलर्सना अगदी सडेतोडपणे उत्तर दिले आहे. देवोलिना भट्टाचार्जी हिने काही काळापूर्वी पती शहनवाझ आणि मुलगा जॉय यांच्यासमवेत गुवाहाटीला फिरायला गेली होती. तेथील तिने आपल्या मुलाबरोबरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.
ज्यावर नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा तिला तिच्या मुलाच्या रंगावर प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. आता देवोलिनाने अशा काही वर्णद्वेषी टिप्पण्यांचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे आणि त्यांना योग्य उत्तर दिले आहे. देवोलिना भट्टाचार्जी यांनी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक टिप्पणी शेअर केली ज्यामध्ये वापरकर्त्याने लिहिले, “काळू मदरी आले”. अभिनेत्रीने यावर उत्तर देत म्हटलं, “आता त्यांच्यासाठी मी काय म्हणावे? आपण तिच्या प्रोफाइलमध्ये पाहू शकता ती स्वतः एक आई आहे. फक्त तिच्या मुलाने या आजाराचा बळी होऊ नये, मी देवाला प्रार्थना करते”. देवोलिनाने आणखी एक स्क्रीनशॉट पोस्ट केला ज्यामध्ये नेटकाऱ्याने लिहिले, “बापरे किती काळं आहे, आणि याला काळा तीट का लावला”. अभिनेत्रीने याला उत्तर देत म्हटलं, “अरे जरा यांचे प्रोफाइल पहा. जय बालाजी. बालाजी देव आपले कोणत्या रंगाचे आहेत. या रोगाचा कोणताही इलाज नाही. बालाजी देव स्वत: हा रोग बरे करू शकणार नाहीत”.
आणखी वाचा – दिवसा शूट, रात्री कॉर्पोरेट जॉब अन्…; ‘ठरलं तर मग’मधील अर्जुन करतो दोन नोकऱ्या, जगतोय असं आयुष्य
दुसर्या व्यक्तीने देवोलिनाच्या मुलाच्या फोटोवर लिहिले, “हा खूप काळा आहे”. यावर अभिनेत्रीने उत्तर दिले, |बाप रे महादेवाचे भक्त. प्रोफाइल बायो पहा यांचा. सकारात्मक व्हाइब्स. परंतु जीवनात नकारात्मकता पसरवणे ही त्याची एकमेव आवड आहे. महादेव प्रेमी, नीळकंठचा रंग काय आहे आपल्याला माहित आहे का?, मुळात नीलकंठ काय आहे हे तरी माहित आहे का?, की नुसती हवाबाजी आणि फॉलोअर्स वाढवणायसाठी महादेवांचे फोटो पोस्ट करता”.

अभिनेत्रीने दुसरा स्क्रीनशॉट शेअर केला त्यात लिहिले होते, ‘गोपी सून हा किती काळा आहे”. देवोलिनाने यावर लिहिले, “तिच्या प्रोफाइलमध्ये भारतीय सैन्याचा अभिमान आहे. भारतीय सैन्य कोण आहे हे देवाला माहित आहे. परंतु जर कोणी असेल तर आपल्या मुली/बहिणी/पत्नीला काही चांगल्या गोष्टी सांगा आणि संस्कार द्या. या सोशल मीडियावर भारतीय सैन्याचे नाव ठेवून, निराशा दूर करून ती ढासळली आहे. एक षडयंत्र देखील असू शकते. कृपया हे शोधा”.





