गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दलजित कौर खूप चर्चेत आहे. दुसरा पती निखिल पटेलपासून दूर झाल्याने सोशल मीडियावर खूप चर्चा केली जात आहे. दोन वर्षांपूर्वी ती लग्नबंधनात अडकली होती. मात्र त्यांचा संसार एक वर्षदेखील टिकू शकला नाही. लग्नानंतर ती पतीबरोबर केन्यादेखील निघून गेली. मात्र मतभेद वाढल्यानंतर ती पुन्हा भारतात परतली. भारतात आल्यानंतर तिने नवऱ्यावर खूप आरोपदेखील केले. पोलिसांत तक्रारदेखील दाखल केली. याबद्दलची सर्व माहिती ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील शेअर करत असते. अभिनेत्री भारतात मुलगा जेडनबरोबर राहत आहे. मात्र तिला या सगळ्यामध्ये तिला आर्थिक समस्यांचादेखील सामना करावा लागत आहे. (dalljiet kaur on home)
दलजित भारतात आली असली तरीही ती मनोरंजन क्षेत्रापासून दूर असलेली पाहायला मिळते. मात्र काही दिवसांपूर्वी तिने ट्रॅव्हल व्लॉगिंग करण्यास सुरुवात केली. यामध्ये तिने तिच्या आयुष्याबद्दल एक खुलासा करत भारतात तिचे घर नसल्यांचे सांगितले आहे.तसेच जे घर होते ते विकले असल्याचेही ती म्हणाली. दलजितने सांगितले की, “मी गेल्या नऊ वर्षांपासून ज्या घरात राहत होते तसेच घरात एक एक गोष्ट मी सजवली होती. पण मी ते घर आता विकले आहे”.
पुढे ती म्हणाली, “आता माझ्याकडे कोणतेही घर नाही.प्रेमामध्ये आपण अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण हरकत नाही. सगळं मी पुन्हा उभारेन. आता आयुष्य एका सूटकेसपासून सुरु झालं आहे. त्यामुळे आता सूटकेस घेऊया आणि संपूर्ण जग फिरुन येऊया”. हे सगळं सांगताना दलजितला अश्रु अनावर झाले होते.
पुढे तिने सांगितले की, “या सगळ्यामध्ये मला माझ्या कुटुंबाने खूप साथ दिली आहे. पण मी मुंबईमध्ये घर शोधण्यासाठी कोणत्याही प्रकारची घाई करणार नाही. कारण मुंबईमध्ये सहज भाड्यावर घर मिळू शकतं. मी माझी गोष्ट पुन्हा लिहिणार आहे”.दरम्यान आता दलजित पुढे काय करणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. तसेच तिच्या व निखिलच्या नात्याचे पुढे काय पडसाद उमटणार? हे पाहाण्यासारखे आहे.