गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दुसऱ्यांदाही लग्न मोडल्यानंतर दलजीत कौरची वाईट अवस्था, घरंही विकलं, मुलाचा सांभाळ करण्यासाठीही पुरेसे पैसे नाहीत अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 30, 2024 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
dalljiet kaur on home

दलजित कौरने घर विकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री दलजित कौर खूप चर्चेत आहे. दुसरा पती निखिल पटेलपासून दूर झाल्याने सोशल मीडियावर खूप चर्चा केली जात आहे. दोन वर्षांपूर्वी ती लग्नबंधनात अडकली होती. मात्र त्यांचा संसार एक वर्षदेखील टिकू शकला नाही. लग्नानंतर ती पतीबरोबर केन्यादेखील निघून गेली. मात्र मतभेद वाढल्यानंतर ती पुन्हा भारतात परतली. भारतात आल्यानंतर तिने नवऱ्यावर खूप आरोपदेखील केले. पोलिसांत तक्रारदेखील दाखल केली. याबद्दलची सर्व माहिती ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनदेखील शेअर करत असते. अभिनेत्री भारतात मुलगा जेडनबरोबर राहत आहे. मात्र तिला या सगळ्यामध्ये तिला आर्थिक समस्यांचादेखील सामना करावा लागत आहे. (dalljiet kaur on home)

दलजित भारतात आली असली तरीही ती मनोरंजन क्षेत्रापासून दूर असलेली पाहायला मिळते. मात्र काही दिवसांपूर्वी तिने ट्रॅव्हल व्लॉगिंग करण्यास सुरुवात केली. यामध्ये तिने तिच्या आयुष्याबद्दल एक खुलासा करत भारतात तिचे घर नसल्यांचे सांगितले आहे.तसेच जे घर होते ते विकले असल्याचेही ती म्हणाली. दलजितने सांगितले की, “मी गेल्या नऊ वर्षांपासून ज्या घरात राहत होते तसेच घरात एक एक गोष्ट मी सजवली होती. पण मी ते घर आता विकले आहे”.

आणखी वाचा – Mithun Chakraborty Dadasaheb Phalke Award : ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर, चित्रपटसृष्टीतील योगदानाबाबत गौरव

View this post on Instagram

A post shared by DALLJIET KAUR ੴ (@kaurdalljiet)

पुढे ती म्हणाली, “आता माझ्याकडे कोणतेही घर नाही.प्रेमामध्ये आपण अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण हरकत नाही. सगळं मी पुन्हा उभारेन. आता आयुष्य एका सूटकेसपासून सुरु झालं आहे. त्यामुळे आता सूटकेस घेऊया आणि संपूर्ण जग फिरुन येऊया”. हे सगळं सांगताना दलजितला अश्रु अनावर झाले होते.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “वोटनुसार ते सेफ होते”, पॅडी कांबळेच्या एक्झिटवर प्रेक्षकांची नाराजी, म्हणाले, “वर्षा उसगांवकर…”

पुढे तिने सांगितले की, “या सगळ्यामध्ये मला माझ्या कुटुंबाने खूप साथ दिली आहे. पण मी मुंबईमध्ये घर शोधण्यासाठी कोणत्याही प्रकारची घाई करणार नाही. कारण मुंबईमध्ये सहज भाड्यावर घर मिळू शकतं. मी माझी गोष्ट पुन्हा लिहिणार आहे”.दरम्यान आता दलजित पुढे काय करणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. तसेच तिच्या व निखिलच्या नात्याचे पुढे काय पडसाद उमटणार? हे पाहाण्यासारखे आहे.     

Tags: dalljiet kaursold housetelevision actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
Dharmaveer 2 Box Office Collection

तीन दिवसांत 'धर्मवीर' चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई, कमावले तब्बल इतके कोटी रुपये, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.