Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून अभिनेता पॅडी कांबळे घराबाहेर पडला असल्याचे पाहायला मिळत आहे. नवव्या आठवड्यात झालेल्या एलिमिनेशनमध्ये घरातील आठही सदस्य नॉमिनेट झाले होते यावेळी या घरातून पॅडी कांबळेला त्याचा प्रवास संपवत निरोप घ्यावा लागला असल्याचा पाहायला मिळालं. कमी मत पडली असल्याने पॅडीला ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट मिळालेली पाहायला मिळाली. दरम्यान निक्की तांबोळी, सूरज चव्हाण हे स्पर्धक पहिल्याच फेरीत सेफ झाले तर वर्षाताई आणि अभिजीत हे दुसऱ्या फेरीत सेफ झालेले पाहायला मिळाले.
त्यानंतर धनंजय, अंकिता व जान्हवी ही स्पर्धक मंडळी ही सेफ असलेली पाहायला मिळाली. पॅडीने यंदाच्या या पर्वात अत्यंत चतुराईने अगदी पहिल्या दिवसापासून खेळी खेळत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सुरुवातीला पॅडी तितकासा खेळत नसल्याने रितेश भाऊने त्याचा चांगलाच क्लासही घेतलेला पाहायला मिळाला. “प्रेक्षक म्हणून तुम्ही इथे आला आहात का?”, असा सवाल त्याने पॅडीला केला त्यानंतर त्याने काही मागे वळून पाहिलं नाही. प्रत्येक स्पर्धकाला भिडत वयाचं कोणतही कारण न देता तो प्रत्येक टास्कमध्ये, प्रत्येक खेळामध्ये तितक्याच चतुरतेने लढत गेला. त्याचा हा खुमासदार प्रवास साऱ्यांच्याच पसंतीस पडला. पॅडीच्या एक्झिटनंतर आता प्रेक्षक मंडळींनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली.
पॅडी कांबळे हा उत्तम खेळ खेळत होता त्यामुळे त्याला कमी वोट पडणं अर्थातच चुकीच आहे, असं मत मांडत हा खेळ पक्षपाती असल्याचं अनेकांनी म्हटलं. पॅडीच्या एक्झिटच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत पॅडी कांबळे ऐवजी वर्षा उसगांवकर एलिमिनेट व्हायला पाहिजे होत्या, असं अनेकांनी म्हटलं. वर्षाताईंचा घरातील वावर, खेळातील चतुरता ही पॅडीपेक्षा थोडीशी मागेच असलेली पाहायला मिळाली. त्यामुळे फिनाले वीकमध्ये जाणं पॅडी डिझर्व करत होता असं अनेकांनी म्हणत कमेंट केलेल्या पाहायला मिळत आहेत.
आणखी वाचा – दोन आठवडे रितेश देशमुखचा भाऊचा धक्का झालाच नाही, पण यामागचं नेमकं कारण काय?
“वर्षा ताई आणि जान्हवीपेक्षा पॅडी भाऊ जास्त चांगले खेळत होते. त्यांना नक्कीच चांगले वोट होते”, “सरळ सरळ सर्वांना माहीत होत वर्षा ताई जात होत्या”, “वर्षाताईच्या जागी आज पॅडी दादाला बाहेर काढलं”, “वोटनुसार पॅडी दादा सेफ होते निक्की जायला पाहिजे होती”, “वर्षा उसगांवकर जायला पाहिजे होत्या”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी नाराजी दर्शविली आहे.