गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

तीन दिवसांत ‘धर्मवीर’ चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कमाई, कमावले तब्बल इतके कोटी रुपये, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 30, 2024 | 6:09 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Dharmaveer 2 Box Office Collection

'धर्मवीर २' चित्रपटाचे तीन दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आले समोर

Dharmaveer 2 Box Office Collection  : धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास उलगडणारा ‘धर्मवीर-२ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट शुक्रवारी (२७ सप्टेंबर) संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट २०२२ साली प्रदर्शित झाला होता. शिवसेनेचे दिवंगत नेते व ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता चित्रपटाच्या सिक्वेलने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केलेली पाहायला मिळत आहे.

हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी थिएटरकडे धाव घेतली. अगदी पहिल्या दिवशीच हाऊसफुल्ल थिएटर पाहायला मिळाले. पहिल्याच दिवशी सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही चित्रपटगृहांमध्ये गर्दी असलेली पाहायला मिळाली. त्यामुळे पहिल्या दोन दिवसात सिनेमाची चांगली कमाई झाली. यानंतर सलग तिसऱ्या दिवशीही चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल्लचा बोर्ड कायम होता. अशातच अवघ्या तीन दिवसांत चित्रपटाने करोडोंच्या घरात कमाई केली असल्याचं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : घरातील सदस्यांनी ठरवली एकमेकांची किंमत, जान्हवीला ४० हजाराचा टॅग दिल्यानंतर रडली, भांडली अन्…; एलिमिनेशनची भीती

‘धर्मवीर 2’ प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या दिवशी या चित्रपटाने १.७५ कोटी इतके रुपये कमावले. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटानेने २.३० कोटी रुपये कमावले. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा गल्ला पाहून एकूण या चित्रपटाने किती रुपये कमावले आहेत ते समोर आलं आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शिका स्नेहल तरडे यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, यामध्ये त्यांनी चित्रपटाची तीन दिवसाच्या कमाईची पोस्ट शेअर केलीय.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “अभिजीत निक्कीच्या ताटाखालचं मांजर”, पॅडी गेल्यानंतर अंकिता-अभिजीतमध्ये फूट, प्रेक्षक भडकले, म्हणाले, “अरबाजनंतर…”

स्नेहल यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘धर्मवीर २’ या चित्रपटाची तीन दिवसाची एकूण कमाई ७.९२ करोड इतकी असल्याचं म्हटलं आहे. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघेंच्या मुख्य भूमिकेत असून अभिनेता क्षितीश दातेही एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची भूमिका निभावतो आहे. तो एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत असल्याने त्याचे विविध सीन सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर होत असलेल्या चर्चेदरम्यान सिनेमाची कमाईही लक्ष वेधून घेणारी ठरली.

Tags: dharmaveer 2Dharmaveer 2 Box Office Collectionmarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
disha patani and mouni roy photos

"समलैंगिक आहेत का?", दिशा पटानी व मौनी रॉयचे 'ते' बिकिनी फोटो पाहून नेटकऱ्यांचे प्रश्न, म्हणाले, "या दोघींना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.