शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ड्रेस-साडी विकते, मुंबई सोडली, लेकीला घेऊन…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीची वाईट अवस्था, घटस्फोटानंतरची परिस्थिती…

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 11, 2025 | 1:09 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Charu Asopa left mumbai

चारु असोपाचा लेकीसह मुंबई सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कलाकारांनाही नेहमीच स्ट्रगल काही चुकला नाही. मानसिक, आर्थिक, शारीरिक सुदृढ राहण्यासाठी कलाकारांना तितकीच मेहनत घ्यावी लागते. त्यातही कलाक्षेत्रातलं काम म्हणजे तारेवरची कसरत. सलग हाती काम असल्यास स्थिरता. अन्यथा आर्थिक स्थिरता कलाकारांच्या आयुष्यामध्ये कठीणच. आता या साऱ्या परिस्थितीशी एक सुप्रसिद्ध अभिनेत्री सामोरं जात आहे. अभिनेत्री चारु असोपाला सध्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आर्थिक स्थिरता नसल्यामुळे चारुने लेकीसह थेट मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेले व्हिडीओ तर थक्क करणारे आहेत. पण एवढा मोठा निर्णय घेण्यामागचं कारण नक्की काय? हे आता समोर आलं आहे. (charu asopa rajeev sen)

साडी-ड्रेस विकण्याची वेळ

चारु आता ड्रेस, साडी सोशल मीडियाद्वारे विकण्याचा प्रयत्न करत आहे. ऑनलाइन व्यवसाय ती करत आहे. त्याचप्रकारचे व्हिडीओ तिने शेअर केले आहेत. चारुने घटस्फोटानंतर हा निर्णय घेतला आहे. तिच्या व्यवसाय करण्याच्या निर्णयावर काहींनी तिचं कौतुक केलं. पण काहींनी तिला विविध प्रश्नही विचारले. “सुष्मिता सेनची वहिनी असूनही तू हे काम करते” अशा प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. या सगळ्या प्रश्नांचं तिने आता उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा – ओम पुरी यांचे घरकाम करणाऱ्या मुलीशी होते प्रेमसंबंध, पत्नीचा खुलासा, लग्नाच्या आदल्या दिवशी सत्य समोर आलं अन्…

View this post on Instagram

A post shared by Charu Asopa (@asopacharu)

हाती पैसेच नाहीत  

हिंदुस्तान टाइम्सशी चारुने संवाद साधला. ती म्हणाली, “राजस्थानमधील माझ्या बिकानेर येथील घरी मी शिफ्ट झाले आहे. सध्यातरी मी मुंबई सोडली आहे. माझ्या आई-वडिलांबरोबर आता मी राहत आहे. मला व जियानाला इथे येऊन एक महिना पूर्ण झाला आहे”. अगदी विचारपूर्वक हा निर्णय घेतला असल्याचं चारुने सांगितलं. मुंबईमध्ये राहण्यासाठी अधिक पैशांची गरज असल्याचं तिचं म्हणणं आहे.

आणखी वाचा – १८ महिने बेरोजगार होते ‘तारक मेहता…’ फेम जेठालाल, कठीण काळाबाबत खुलासा, म्हणाले, “२४ वर्षांच्या अनुभवानंतरही…”

मुंबईत राहण्यासाठी खूप खर्च

चारु पुढे म्हणाली, “मुंबईत राहणं सोप्प नाही. खूप पैसे खर्च होतात. महिन्या एक ते दीड लाख रुपये खर्च व्हायचे. घराचं भाडं आणि इतर खर्च मिळून ही रक्कम होती. मुंबईच्या बाहेर चित्रीकरण करत असताना मुलीला नॅनीकडे सोडून जाणं मला जमत नव्हतं”. चारुने तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीलाही मुंबई सोडण्याच्या निर्णयाबाबत सांगितलं. तो कधीही मुलीला येऊन भेटू शकतो असंही चारु म्हणाली. राजीव व चारुचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिच लेकीचा सांभाळ करते. राजीव सुष्मिता सेनचा भाऊ असल्याने हा घटस्फोट चर्चेचा विषय रंगला. पण आता चारु एकटीने मुलीचा सांभाळ अगदी योग्य पद्धतीने करत आहे.

Tags: bollywood newsentertainmententertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Dnyanada Ramtirthkar Kelvan
Entertainment

अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरची लगीनघाई, पहिल्या केळवणाचे फोटो समोर, ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील कलाकार…

एप्रिल 16, 2026 | 1:50 pm
Sonali Kulkarni latest post
Entertainment

विमानात रडणाऱ्या बाळाच्या कानाखाली मारली आणि…; आईच्या ‘त्या’ कृतीवर भडकली मराठी अभिनेत्री, सांगितला धक्कादायक प्रसंग

एप्रिल 16, 2026 | 1:22 pm
Akshay Kumar fitness :
Lifestyle

‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने १५ वर्षांपासून खाल्ला नाहीय समोसा, वयाच्या ५९ व्या वर्षी आहे इतका फिट, कारण आहे…

एप्रिल 16, 2026 | 11:00 am
Reasons For Sugar Cravings 
Lifestyle

जेवणानंतर आपल्याला मिठाई का हवी असते?, आयुर्वेदात दडलंय याचं रहस्य, वाचा सविस्तर

एप्रिल 16, 2026 | 10:10 am
Next Post
Alka Kubal On Atrocity

चार मुलींवर बापाकडूनच बलात्कार, त्यांचा खून…; अलका कुबल भडकल्या, म्हणाल्या, “काय सोडायचं?”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.