सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी अभिनयासह इतर क्षेत्रातही पाऊल टाकत प्रगती करताना दिसत आहेत. बऱ्याच कलाकारांनी अभिनयाशिवाय इतर व्यवसाय क्षेत्रात उडी घेतलेली पाहायला मिळत आहे. काहींनी दागिने तर काहींनी हॉटेल क्षेत्रात पदार्पण करत स्वतःच्या नावे व्यवसाय सुरु केलेला पाहायला मिळत आहे. यांत मुख्यत्वे महिला कलाकारांच प्रमाण अधिक असलेलं पाहायला मिळत आहे. अनघा अतुल, सुप्रिया पाठारे, श्रेया बुगडे या अभिनेत्रींनी स्वतःचं हॉटेल सुरु केलं आहे. या पाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्रीने एका वेगळ्याच व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. (Tejaswini Pandit New Business)
ही अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. अभिनयाने व सौंदर्याने अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अभिनयाशिवाय तेजस्विनी व अभिज्ञा भावेचा मिळून एक कपड्याचा ब्रँडही आहे. याशिवाय आता अभिनेत्रीने आणखी एका व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अभिनेत्रीने नुकतंच पुण्यात आलिशान सलोन सुरु केलं आहे. मध्यरात्रीपर्यंत सुरु राहणारं हे पुण्यातील पहिलं सलोन असणार आहे. त्यामुळे याला ‘एम टू एम’ असं नाव देण्यात आलं आहे.
नव्या आलिशान सलोनची झलक शेअर करत तेजस्विनीने एक पोस्ट शेअर केली आहे. यांत तिच्या आलिशान सलोनची झलक पाहायला मिळत आहे. भव्यता दाखवणारं तसेच रोषणाईत उजळून निघालेलं हे तेजस्विनीच नवं सलोन साऱ्यांच्या पसंतीस पडलं आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये, “माननीय राज ठाकरे साहेब तुम्ही वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात यासाठी तुमचे खूप खूप आभार! ‘एम टू एम’ हे पुण्यातील पहिलं मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणारं सलोन आहे. तुम्ही सुद्धा नक्की या!” असं म्हटलं आहे.
अभिनेत्रीच्या सलोनचा नुकताच भव्य दिव्य उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी अभिनेत्रीच्या या सलोनच उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. दरम्यान, तेजस्विनीच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी तिला शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळत आहेत.