मंगळवार, एप्रिल 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ का सोडली?, अभिनेत्याने कारण सांगताच समीर चौघुले, प्रसाद खांडेकर म्हणाले, “भावा तुला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 8, 2024 | 1:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gaurav More Exit From Mhj

गौरव मोरेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' का सोडली?, अभिनेत्याने कारण सांगताच समीर चौघुले, प्रसाद खांडेकर म्हणाले, "भावा तुला..."

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय रिऍलिटी शोने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. या रिऍलिटी शोचे केवळ महाराष्ट्रातच नव्हेतर जगभरात चाहते आहेत. अशी बरीच मंडळी आहेत जी त्यांच्या मोकळ्या वेळेत मनोरंजनाचे साधन म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम पाहतात. या कार्यक्रमातील कलाकारांनी आजवर त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं आहे. या कार्यक्रमातील कलाकारांचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर हास्यजत्रेतील ही कलाकार मंडळी नेहमीच सक्रिय असतात. (Gaurav More Exit From Mhj)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, गौरव मोरे, इशा डे, रसिका वेंगुर्लेकर, निखिल बने, ओंकार राऊत यांसारखी अनेक कलाकार मंडळी धुमाकूळ घालत असतात. मात्र ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील एका कलाकाराकडून धक्कादायक बातमी समोर आली आहे. हास्यजत्रेतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला गौरव मोरेने या कार्यक्रमाला कायमचा रामराम ठोकला आहे. याबाबतची पोस्ट सोशल मीडियावरुन शेअर करत त्याने ही बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. गौरव सध्या हिंदी रिऍलिटी शो ‘मॅडनेस मचाऐंगे’मध्ये धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी अभिनेता ओंकार भोजनेनेही हास्यजत्रेतून एक्झिट घेतली. आता ओंकार पाठोपाठ गौरवही ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतून बाहेर पडला आहे.

आणखी वाचा – “खूप वाईट वाटतंय आणि…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून गौरव मोरेची कायमची एक्झिट, शो सोडल्यानंतर म्हणाला, “माफी मागतो कारण…”

View this post on Instagram

A post shared by Gaurav More (@im_gaurav_more20)

गौरवची ही पोस्ट पाहून सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. गौरवच्या काही चाहत्यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी गौरव हास्यजत्रेत दिसणार नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली. दरम्यान गौरवच्या या पोस्टवर त्याचे हास्यजत्रेतील सहकलाकार समीर चौघुले व प्रसाद खांडेकरनेही कमेंट केलेली पाहायला मिळत आहे. समीरने कमेंट करत, “तुला खूप शुभेच्छा गौरव. खूप प्रेम”, असं म्हटलं. तर प्रसादने कमेंट करत, “भावा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा”, असं म्हटलं.

आणखी वाचा – ना हातभर मेहंदी, ना अवाढव्य खर्च; लग्नाच्या वर्षभरानंतर ‘पारू’ फेम शरयू सोनावणेच्या मेहंदी सोहळ्याची रंगली चर्चा, साधेपणाचं कौतुक

गौरवने पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “नमस्कार, पवई फिल्टरपाड्यातून मी गौरव मोरे. तानानानाना. आरा बाप मारतो का काय मी…ये बच्ची… रसिक प्रेक्षक आपण या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं. सन्मान दिला. त्याबद्दल मी व माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत. मला सांगताना खूप वाईट वाटत आहे की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधुन आपला निरोप घेत आहे. माझ्या कामातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासुन माफी मागतो”.

Tags: gaurav moreGaurav More Exit From MHJmaharashtrachi hasyajatraprasad khandekarsamir chaughule
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Maharashtrachi Hasyajatra fame Gaurav More responded to a fan's comment saying that everything has a reason.

"ओंकार भोजनेसारखा चुकीच्या शोमध्ये जाऊन...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडल्यानंतर गौरव मोरेला नेटकऱ्याने सुनावलं, अभिनेता म्हणाला, "प्रत्येक गोष्टीला..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.