अभिनेत्री तेजश्री प्रधान ही तिच्या सहज अभिनयाने कायमच प्रेक्षकांचं मन जिंकते.होणार सून मी ह्या घरची या मालिकेने जान्हवीच्या रूपात तेजश्री घराघरात पोहचली. या मालिकेमुळे तेजश्री प्रक्षज्योतात आली आणि तिला एक वेगळी प्रसिद्धी मिळाली.होणार सून मी या घरची मालिकेपूर्वी तेजश्रीने ह्या गोजिरवाण्या घरात, तुझं नि माझं घर श्रीमंतच, लेक लाडकी ह्या घरची या मालिका केल्या होत्या. जान्हवी या तिच्या भूमिकेला पसंती मिळाल्या नंतर तेजश्रीची अगबाई सासूबाई ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. या मालिकेतील तिच्या शुभ्रा या भूमिकेला देखील चांगला प्रतिसाद मिळाला.(Tejashri Pradhan)
छोट्या पडद्यावर तेजश्रीच्या नावाचं एक वलय तयार झालं तसेच मोठ्या पडद्यावर देखील तेजश्रीने तिच्या कामाची छाप पाडली आहे.झेंडा या चित्रपटातून तेजश्रीने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. लग्न पाहावे करून, ती सध्या काय करते, डॉ. प्रकाश बाबा आमटे, शर्यत, जजमेंट यांसारख्या अनेक चित्रपटातून तेजश्रीने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
पाहा तेजश्रीला कोणत्या अभिनेत्यासोबत काम करायचं आहे? (Tejashri Pradhan)
प्रत्येक कलाकाराची कलाकाराची कलाकार म्हणून काही स्वप्न असतात, काही इच्छा असतात.आपण विशिष्ट प्रकारची भूमिका करावी किंवा एखाद्या अभिनेत्यासोबत किंवा अभिनेत्रीसोबत काम करावं.जजमेंट या चित्रपटात तेजश्री अभिनेता मंगेश देसाई सोबत मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली होती. याच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान इट्स मज्जाला दिलेल्या एका मुलाखतीत तेजश्रीला विचारण्यात आले होते, तुला कोणत्या अभिनेत्या सोबत काम करायला आवडेल? तेव्हा तेजश्री म्हणाली तिला अभिनेता विकी कौशल सोबत काम करायची इच्छा आहे.(Tejashri Pradhan)

हे देखील वाचा : तेजश्री-सुबोध प्रमुख भूमिकेत
चित्रपट,मालिका यांसोबत कार्टी काळजात घुसली, तिला काही सांगायचंय या नाटकांमध्ये देखील तेजश्री पाहायला मिळाली. मराठी प्रमाणे हिंदी सिनेसृष्टीमध्ये देखील तेजश्रीने तिच्या कामाला सुरुवात केली आहे.