एखादा चित्रपट मालिका आपण बघतो तेव्हा प्रेक्षक म्हणून बघताना सगळंच खूप सहज,सोपं आणि छान दिसत.पण पडद्यामागे खूप कष्ट आणि त्यासोबत धमाल देखील सुरु असते. मालिका मोठ्या काळापर्यंत सातत्याने प्रेक्षकांसमोर येत असतात.मालिकेशी प्रेक्षक खूप जोडलेले देखील असतात, कलाकारांची पडद्यामागची धमाल, बॉण्डिंग, सिन कसे शूट होत असतील? या विषयी उत्सुकता असते. (Sukh Mhanje Nkki Kay Ast BTS)
‘सुख म्हणजे नक्की काय असत’ ही मालिका बराच काळ सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. जयदीप आणि गौरीच्या जोडीला जितकं प्रेम मिळत, तितकच मालिकेतील खलनायिका देखील विशेष चर्चेत असतात.मालिकेचं कथानक प्रेक्षकांची उत्सुकता खिळवून ठेवत त्यामुळे नवनवीन मालिकांमध्ये देखील सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत स्वतःचे स्थान टिकवून ठेवले आहे.
पाहा कसा शूट झाला सीन? (Sukh Mhanje Nkki Kay Ast BTS)
एखादा मालिकेत गंभीर दिसणारा सिन शूट होताना मात्र खूप धमाल झालेली असू शकते, असाच सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेचा एक सिन शूट करतानाच BTS समोर आला आहे.अभिनेता कपिलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा BTS शेअर केला आहे. कपिलने या व्हिडिओला ‘फनी इन्सिडेंट’ असं कॅप्शन दिल आहे.
माईंच्या पदराला आग लागण्याचा हा सीन आहे. तेव्हाच शूट करताना उदयच्या शर्ट वर आगीची ठिणगी उडते. अत्यंत मजेशीर पद्धतीने हा सीन शूट केला आहे. मालिकेत एकमेकांच्या विरोधात उभे असणारे, एकमेकांचा रागराग करणारे कलाकार हेच सीन शूट करताना मात्र बऱ्याचदा धमाल करताना पाहायला मिळतात.त्यांचं एकमेकांसोबतच ऑफस्क्रीन बॉण्डिंग ही चांगल असत.(Sukh Mhanje Nkki Kay Ast BTS)
हे देखील वाचा : खुशबू तावडेच्या मुलाची आई कुठे काय करतेच्या सेटवर धमाल