तेजश्री-सुबोध प्रमुख भूमिकेत

Tejshri Pradhan And Subodh Bhave
Tejshri Pradhan And Subodh Bhave

होणार सून मी या घरची मालिकेतील जान्हवी या भूमिकेमुळे अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरात पोहोचली.तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.तुझं नि माझं घर श्रीमंतच, अगंबाई सासूबाई, या देखील तेजश्रीच्या काही गाजलेल्या मालिका आहेत. तिच्या प्रत्येक भूमिकेचं वेगळंपण जपण्याचा प्रयत्न तेजश्री करत असते. म्हणून मालिकेतील तिची पात्र प्रेक्षकांना आपलीशी वाटतात.(Tejshri Pradhan And Subodh Bhave)

छोट्या पडद्याप्रमाणेच मोठ्या पडद्यावर देखील तेजश्रीने आपल्या अभिनयाची छाप पाडलेली बघायला मिळते. झेंडा या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्या नंतर लग्न पहावे करून, डॉ. प्रकाश बाबा आमटे, ती सध्या काय करते असे अनेक चित्रपट केले.चित्रपट मालिकांन बरोबरच नाटकाच्या माध्यमातून देखील तेजश्रीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. कार्टी काळजात घुसली, तिला काही सांगायचंय या मराठी नाटकांमधून ती प्रेक्षकांसमोर आली. मराठी प्रमाणे हिंदीसिनेसृष्टी मध्ये देखील तेजश्रीने पदार्पण केले आहे.बबलू बॅचलर हा तिचा हिंदी चित्रपट आहे त्याचसोबत में और तुम हे हिंदी नाटक देखील तेजश्रीने केले आहे.

पहा सुबोध- तेजश्री साकारणार चित्रपटात नवीन भूमिका (Tejshri Pradhan And Subodh Bhave)

अशा वेग-वेगळ्या प्रोजेक्ट मधून तेजश्री कायम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं प्रयत्न करत असते.तेजश्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून चित्रपटाच्या मुहूर्ताची स्टोरी शेअर केली आहे.त्यात तिने अभिनेता सुबोध भावेंना टॅग केले आहे. यावरून लवकरच तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे हि जोडी नव्या चित्रपटातून एकत्र पहायला मिळणार असं वाटतं आहे.तेजश्रीचा नवीन चित्रपट आणि तेजश्री सुबोध यांची जोडी याबद्दल नक्कीच उत्सुकता आहे.(Tejshri Pradhan And Subodh Bhave)

सुबोध भावेंनी मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार सिनेमे आज पर्यंत दिले आहेत. त्यांचा भूमिकेचा अभ्यास त्यांचे काम पडद्यावर बघताना लगेच जाणवतो.बालगंधर्व, डॉ. काशिनाथ घाणेकर, लोकमान्य टिळक यांच्या सुबोध भावेंनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षक कधीच विसरू शकत नाहीत. चित्रपट ऐतिहासिक असो, विनोदी असो किंवा प्रेम कहाणी असो प्रत्येक भूमिकेचं वेगळपण सुबोध कायमच जपत आले आहेत.सध्या त्यांचा फुलराणी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि पसंतीस उतरला. म्हणूनच अभिनयाची उत्तम जाण असणारे कलाकार जेव्हा एकत्र येतात. तेव्हा त्यांचं ते काम मोठ्या पडद्यावर पाहणं समाधानकारकच ठरत.

हे देखील वाचा : ‘मराठी कलाकारांना ट्रोल करणं….’मराठी प्रेक्षकांनाकडे संतोषने व्यक्त केली खंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Vanita Kharat talks obesity
Read More

‘मी जाड आहे पण..’ लठ्ठपणावर केलं वनिताने परखड भाष्य

परखड, बिनधास्त व्यक्तिमत्वांमुळे ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात. आपल्या मनाला वाटेल ते कायम करणं,…
Onkar Bhojane Ankita Walavalkar
Read More

अंकिता आणि ओंकारच्या हळदीची रंगली चर्चा

कलाकार मंडळींनी आपला क्रश सांगितला की, प्रेक्षक त्यांच्यात नातेसंबंध असल्याच्या चर्चा करतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवलेल्या ओंकार…
Hindustani Bhau Sameer Wankhede
Read More

हिंदुस्थानी भाऊचा समीर वानखेडेला पाठिंबा-जाणून घ्या काय म्हणाला हिंदुस्थानी भाऊ?

एनसीबी चे माजी संचालक समीर वानखेडे,अभिनेता शाह रुख खानचा मुलगा आर्यन खानला केलेल्या अटकेमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले
Jitendra Joshi Daughter Reva
Read More

“लेकीची १३ व्या महिन्यात पहिली ट्रिप ते १३ व्या वर्षी पहिली आंतरराष्ट्रीय ट्रिप” जितू आणि रेवाची लंडन वारी, शेअर केला खास व्हिडिओ

सगळ्या नात्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रेमळ नातं समजलं जात ते म्हणजे वडील आणि मुलीचं. सध्या परदेशवारीत बिझी आहे मराठी…