शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चित्रपटगृहानंतर सूर्याचा बहूप्रतिक्षित ‘कंगुवा’ आता ओटीटीवर, कधी व कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 27, 2024 | 5:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tamil actor Surya movie Kanguva will be released on Prime Video OTT platform

तमिळ अभिनेता सूर्याचा कंगुवा हा चित्रपट प्राइम व्हिडीओ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे

तमिळ सुपरस्टार सूर्या व बॉबी देओल यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘कंगुवा’ काही दिवसांपूर्वी १४ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाची आगाऊ बुकिंग झाली होती. त्यामुळे अनेकांना हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल अशी आशा होती. पण चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ‘कंगुवा’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण सुरुवातीचे २-३ दिवस चांगले कलेक्शन केल्यावर चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. (Kanguva OTT Release)

आठवडाभरापूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे अनेक लोक हा चित्रपट ओटीटीवर येण्याची वाट पाहत होते. आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. ‘कंगुवा’चे ओटीटी राइट्स प्राइम व्हिडीओने या ओटीटी माध्यमाने विकत घेतले आहेत. हा चित्रपट लोकांना प्राइम व्हिडीओ या ओटीटी माध्यमावर पाहता येईल.

View this post on Instagram

A post shared by Suriya Sivakumar (@actorsuriya)

आणखी वाचा – उर्मिला कोठारेची लेकीसह इंटरनॅशनल ट्रीप, ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष, म्हणाली, “माझी राजकुमारी…”

प्राइम व्हिडीओने हा चित्रपट तब्बल १०० कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर दीड ते दोन महिन्यांनी ओटीटीवर येईल. ‘कंगुवा’ने भारतात पहिल्या दिवशी २२ कोटी रुपये कमावले. तब्बल ३५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये ‘कंगुवा’ची निर्मिती करण्यात आली आहे. त्या तुलनेत पहिल्या दिवसाची कमाई खूप कमी होती. काही लोकांनी चित्रपटातील कलाकार, कथा आणि व्ही.एफ.एक्स.चे कौतुक केले. अनेकांना बॉबी दओल खलनायक म्हणून पुन्हा एकदा भावला.

आणखी वाचा – बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचं कार अपघातात निधन, १८ वर्षीय मुलाचा मित्रामुळे गेला जीव, नेमकं काय झालं?

दरम्यान, ‘कंगुवा’ हा तमिळ चित्रपट असून तो हिंदीतही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉबी देओलने खलनायकाची भूमिका साकारली आहे, तर बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सूर्याच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटाद्वारे दिशा पटानीने तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. सिरुथाई सिवा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.  हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये बनवण्यात आला आहे. 

Tags: KanguvaKanguva Movie OTT NewsKanguva OTT Release
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
rupali ganguly step daughter post

५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यानंतर रुपाली गांगुलीच्या सावत्र मुलीचं भाष्य, म्हणाली, “खरं बोलण्याची इतकी मोठी शिक्षा...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.