टेलिव्हीजनवरील लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ मालिकेतील मुख्य भूमिका सकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली सध्या खूप चर्चेत आहे. रुपाली व तिची सावत्र मुलगी ईशा वर्मा यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठे वाद सुरु आहेत. सोशल मीडियावर ईशाने अनेक व्हिडीओ शेअर केले होते. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चादेखील सुरु झाली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी रुपालीने सावत्र मुलीच्या विरोधात ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता. यावरुन आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. दरम्यान आता यावरुनच ईशानेदेखील एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून तिने वडिलांबद्दलही भाष्य केले आहे. (rupali ganguly step daughter post)
ईशाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रुपालीकडून करण्यात आलेल्या ५० कोटी रुपयांच्या मानहानीबद्दल भाष्य केले तसेच वडिलांनादेखील सुनावलं आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले की, “या महिन्याच्या सुरुवातीला मी खूप कठीण निर्णय घेतला. यामध्ये मी माझ्या वडिलांबरोबर कशी मोठी झाले याबद्दल सगळं सांगितलं. याबद्दल मी सगळं काही शेअर केलं. माझ्या या निर्णयाने सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले. समोरा समोर बोलणं हे माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण गेल्या अनेक वर्षांचे मौन पाळल्यानंतर माझ्या आयुष्यात शांती आली आहे”.

तिने लिहिले की, “गेल्या २४ वर्षांपासून मी अडकले होते. मला माझ्या बोलण्याने कोणाला दुखी करायचं नव्हतं. पण हे सगळं बोलणं मला गरजेचं होतं. पण एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की स्वतःच्या मुलाला खरं बोलण्याची इतकी मोठी शिक्षा मिळू नये. मी एक तरुण मुळही आहे पण मी अजूनही माझ्या वडिलांची मुलगी आहे. त्यांनी मला खूप क्रूरपणे उत्तर दिलं आहे. हाच त्यांचा खरा चेहरा आहे”.
नंतर ती म्हणाली, “या सगळ्या प्रकरणात माझं हे शेवटचं बोलणं आहे. यामधून मला सगळे गैरसमज दूर करायचे आहेत. तसेच माझ्या आयुष्यातील सगळ्या समस्या मला दूर करायच्या आहेत. यानंतर मी एकाही मुलाखतीमध्ये किंवा या चर्चांवर अजिबात सहभाग घेणार नाही”. दरम्यान ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रुपाली यावर काय उत्तर देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.