तमिळ सुपरस्टार सूर्या व बॉबी देओल यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘कंगुवा’ काही दिवसांपूर्वी १४ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. प्रदर्शनाआधीच या चित्रपटाची आगाऊ बुकिंग झाली होती. त्यामुळे अनेकांना हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल अशी आशा होती. पण चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ‘कंगुवा’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण सुरुवातीचे २-३ दिवस चांगले कलेक्शन केल्यावर चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. (Kanguva OTT Release)
आठवडाभरापूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे अनेक लोक हा चित्रपट ओटीटीवर येण्याची वाट पाहत होते. आता या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. ‘कंगुवा’चे ओटीटी राइट्स प्राइम व्हिडीओने या ओटीटी माध्यमाने विकत घेतले आहेत. हा चित्रपट लोकांना प्राइम व्हिडीओ या ओटीटी माध्यमावर पाहता येईल.
आणखी वाचा – उर्मिला कोठारेची लेकीसह इंटरनॅशनल ट्रीप, ‘त्या’ फोटोने वेधलं लक्ष, म्हणाली, “माझी राजकुमारी…”
प्राइम व्हिडीओने हा चित्रपट तब्बल १०० कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याचं म्हटलं जात आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर दीड ते दोन महिन्यांनी ओटीटीवर येईल. ‘कंगुवा’ने भारतात पहिल्या दिवशी २२ कोटी रुपये कमावले. तब्बल ३५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये ‘कंगुवा’ची निर्मिती करण्यात आली आहे. त्या तुलनेत पहिल्या दिवसाची कमाई खूप कमी होती. काही लोकांनी चित्रपटातील कलाकार, कथा आणि व्ही.एफ.एक्स.चे कौतुक केले. अनेकांना बॉबी दओल खलनायक म्हणून पुन्हा एकदा भावला.
दरम्यान, ‘कंगुवा’ हा तमिळ चित्रपट असून तो हिंदीतही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉबी देओलने खलनायकाची भूमिका साकारली आहे, तर बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सूर्याच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटाद्वारे दिशा पटानीने तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. सिरुथाई सिवा या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये बनवण्यात आला आहे.